पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्‍यानंतर बांगलादेशात आणखी एका मंदिरावर आक्रमण !

सरस्वती देवीच्या मूर्तीची धर्मांधांकडून तोडफोड !

अशा घटना रोखण्यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावेत, असेच हिंदूंना वाटते !

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाच्या बोगुला जिल्ह्यातील धुनोत उपजिल्ह्यातील एका मंदिरातील सरस्वतीदेवीच्या मूर्तीची धर्मांधांकडून तोडफोड करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बांगलादेश दौर्‍या झाल्यावर मगुर जिल्ह्यातील महंमदपूर उपजिल्ह्यातील ४०० वर्षे जुन्या मंदिरात तोडफोड करण्यात आली होती. तसेच ब्राह्मणबरीया येथे कालीमाता आणि श्रीकृष्ण यांच्या मंदिरातही तोडफोड केली होती.

मंदिराच्या व्यवस्थापिका सुमोतीराणी सेबायत यांनी सांगितले की, मी रात्री पूजा करून घरी गेली आणि पहाटे ४ वाजता मंदिरात आले, तेव्हा मंदिराच्या कुंपणाचे दार उघडलेले होते. तसेच येथे कपडे जाळण्यात आले होते. सरस्वतीदेवीच्या मूर्तीची तोडफोड करण्यात आली होती.

वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक