ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांचे त्यागपत्र !

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी त्यांच्या कार्यालयामधील त्यांच्या सहकारी महिलेचे चुंबन घेतल्याने त्यांना त्यागपत्र द्यावे लागले आहे. या चुंबनाचा व्हिडिओ आणि छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले.

कोरोनाच्या ‘डेल्टा’ प्रकारामुळे नियमांचे काटेकोर पालन करा ! – जागतिक आरोग्य संघटना

प्रथम भारतात आढळून आलेल्या कोरोनाच्या ‘डेल्टा’ या प्रकाराचे जगातील जवळपास ८५ देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत सापडलेल्या कोरोनाच्या प्रकारांमध्ये हा प्रकार सर्वाधिक वेगाने संसर्ग होणारा आहे.

आतंकवादाला समर्थन आणि आश्रय देणारे देश दोषी !

जागतिक स्तरावर पाकचे नावही न घेणारा भारत कधीतरी पाकपुरस्कृत आतंकवाद आणि पाक यांना नष्ट करण्याचे धाडस दाखवू शकेल का ? भारताच्या अशा मुळमुळीत भूमिकेमुळे देशात गेली ३ दशके चालू असलेला जिहादी आतंकवाद नष्ट झालेला नाही, हीच वस्तूस्थिती आहे !

पाकिस्तान एफ्.ए.टी.एफ्.च्या काळ्या सूचीमध्ये जाण्यापासून पुन्हा बचावला !

मुळात जागतिक देशांनी पाकला ‘आतंकवादी देश’ म्हणून घोषित करणे आवश्यक आहे ! भारतानेही तशी सातत्याने मागणी केली पाहिजे !

जर्मनीमध्ये तरुणाकडून चाकूद्वारे आक्रमण : काही जणांचा मृत्यू !

पोलिसांनी तरुणावर केलेल्या गोळीबारात तो घायाळ झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

(म्हणे) ‘लडाखमध्ये भारताने घुसखोरी केली !’

स्वातंत्र्यानंतरच्या ७४ वर्षांत एकाही शासनकर्त्याने चीनला ‘जशास तसे’ उत्तर न दिल्याने तो भारताच्या संदर्भात वाटेल ते बोलतो आणि वाटेल तसे वागतो ! हे आजपर्यंतच्या शासनकर्त्यांना लज्जास्पद !

चीनकडून अरुणाचल प्रदेशजवळील भागात बुलेट ट्रेनची सेवा चालू !

चीन सीमेजवळ पोचण्यासाठी विविध सुविधा निर्माण करत आहे. भारतानेही चीनला शह देण्यासाठी अशा प्रकारच्या सुविधा निर्माण करण्याची आवश्यकता आहे !

आम्हाला उत्तेजित केल्यास पुढचा बॉम्ब युद्धनौकांच्या मार्गामध्ये नाही, थेट नौकांवर पाडू ! – रशियाची ब्रिटनला चेतावणी

काळ्या समुद्रामध्ये रशियाच्या समुद्र सीमेजवळ ब्रिटीश नौदलाने अधिक हालचाली करून आम्हाला उत्तेजित करण्याचा प्रयत्न करू नये. त्याने तसे केल्यास आम्ही ब्रिटीश युद्धनौकांच्या मार्गावर नाही, तर थेट युद्धनौकांवर बॉम्ब टाकू, अशी चेतावणी रशियाने ब्रिटनला दिली आहे.

जिहादी आतंकवादी हाफीज सईद याच्या घराबाहेर पाक सैन्यानेच बॉम्बस्फोट घडवल्याची शक्यता

जौहर टाऊनमधील अकबर चौकात असणार्‍या जिहादी आतंकवादी हाफीज सईद याच्या घराबाहेर ३ दिवसांपूर्वी झालेला बॉम्बस्फोट हा पाकच्या सैन्यानेच घडवून आणल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या स्फोटात ४ जण ठार, तर १४ जण घायाळ झाले होते. 

इंडोनेशियामध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती लपवून ठेवणार्‍या इस्लामी धर्मगुरूला ४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा !

‘शिहाब यांनी माहिती लपवल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या, तसेच त्यांनी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण केला’, असे न्यायालयाने शिक्षा ठोठावतांना म्हटले.