थायलंडमध्ये बौद्ध भिक्षूने स्वतःचे शिर कापून भगवान बुद्धाला केले अर्पण !

मूर्तीसमोर शिर कापल्यावर स्वतः भगवान बुद्ध तेथे येतील आणि ते दोन्ही हातांनी त्यांचे शिर पकडतील, त्यांचे असे म्हणणे होते की, जर त्यांनी भगवान बुद्धाला शिर कापून अर्पण केले, तर त्याचे फळ त्यांना पुढील जन्मात मिळेल.

पुढील ४५ वर्षांत स्विडन मुसलमानबहुल देश होईल ! – संशोधकाचा दावा

युरोपमधील अनेक देशांमध्ये मध्य-पूर्व देशांतील यादवीमुळे लाखोंच्या संख्येने मुसलमान शरणार्थी पोचले आहेत. त्यांच्यामुळे गेल्या काही वर्षांपासून युरापीय देशांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती वाईट झाली आहे.

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे मृतदेहांची अदलाबदल

मुसलमानाकडे हिंदूचा, तर हिंदूकडे मुसलमानाचा मृतदेह ! मुसलमानांकडून पुरण्यात आलेला हिंदूचा मृतदेह काढून अग्नीसंस्कार !

पाक फ्रान्सच्या राजदूताची करणार हकालपट्टी !

पाकने फ्रान्सच्या राजदूताची हकालपट्टी करण्याची, तसेच फ्रान्सच्या निषेधार्थ आंदोलन करणार्‍या ‘तहरीक-ए-लब्बैक’ या बंदी घातलेल्या संघटनेच्या विरोधातील खटले मागे घेण्याची घोषणा केली

एस्.एस्.आर्.एफ्.चे साधक दांपत्य मलहेर्बे यांच्याकडून सिंगापूर येथे गुढी उभारून नववर्षदिन साजरा !

कुठे हिंदु संस्कृतीनुसार नववर्षदिन साजरा करणारे विदेशी, तर कुठे पाश्‍चात्त्याचे अंधानुकरण करून १ जानेवारीला नववर्ष साजरा करणारे जन्महिंदू !

८१ टक्के लसीकरण आणि संसर्ग न्यून झाल्याने इस्रायलमध्ये मास्कला सुट्टी !

इस्रायलमध्ये आता कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क घालण्याची आवश्यकता नाही, असा आदेशच प्रशासनाने तेथील नागरिकांना दिला आहे. प्रशासनाच्या आदेशामुळे लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. इस्रायलची लोकसंख्या ९३ लाख असून यांतील ८१ टक्के लोकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे.

चीनच्या तैवानवर आक्रमण करण्याच्या शक्यतेमुळे ऑस्ट्रेलिया करत आहे युद्धसज्जता !

येत्या ५ वर्षांत चीनकडून तैवानवर आक्रमण करण्याच्या शक्यतेमुळे ऑस्ट्रेलियाने चीनशी युद्ध करण्याची सिद्धता चालू केली आहे. यासाठी रणनीती आखण्यात येत आहे. याच आठवड्यात चीनने त्याच्या २५ लढाऊ विमानांची एक तुकडी तैवानच्या आकाश क्षेत्रात पाठवली होती.

चीन सरकार लोकांना लस घेण्यासाठी देत आहे अंडी आणि शॉपिंग कुपन !

चीनमधील नागरिक त्यांच्या देशाच्या कोरोना लसीवर विश्‍वास ठेवत नसल्याने लसीकरणाचा वेग अत्यंत धीमा आहे. त्यामुळे सरकार लसीकरण वाढवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहे.

चिनी सैन्याचा हॉट स्प्रिंग्ज, गोग्रा आणि देप्सांग येथून माघार घेण्यास नकार

चीन विश्‍वसघातकी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. चिनी सैन्याने जरी माघार घेतली असती, तरी त्याने परत अधिक गतीने भारतात घुसखोरी केली असती ! यामुळेच चीनपासून भारताने सतर्क रहाणेच आवश्यक !

(म्हणे) ‘अमित शहा यांची बांगलादेशविषयी माहिती मर्यादित आणि तोकडी !’

भारतात अवैधरित्या वास्तव्य करत असलेल्या बांगलादेशी घुसखोरांना बांगलादेशानी मायदेशी बोलावून त्यांना पोसावे !