
लाहोर (पाकिस्तान) – येथील जौहर टाऊनमधील अकबर चौकात असणार्या जिहादी आतंकवादी हाफीज सईद याच्या घराबाहेर ३ दिवसांपूर्वी झालेला बॉम्बस्फोट हा पाकच्या सैन्यानेच घडवून आणल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या स्फोटात ४ जण ठार, तर १४ जण घायाळ झाले होते.
हाफिज सईदच्या घराबाहेर पाकिस्तानी लष्करानेच घडवला स्फोट?; कारण ठरली ‘ती’ बाचाबाचीhttps://t.co/KpSQOUsMzi
या स्फोटामध्ये १४ जण जखमी झाले असून चौघांचा मृत्यू झालाय.#hafizsaeed #PakistanArmy #Pakistan #LahoreBlast #Lahore— LoksattaLive (@LoksattaLive) June 25, 2021
मे मासाच्या तिसर्या आठवड्यामध्ये पाकिस्तानी सैन्य, आय.एस्.आय. आणि जिहादी आतंकवादी संघटनांचे प्रमुख यांची पाकव्याप्त काश्मीरमध्ये एक बैठक झाली होती. या बैठकीमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या काही म्होरक्यांना ‘काश्मीरमध्ये आतंकवाद्यांची घुसखोरी अल्प का झाली ? मागील दीड वर्षामध्ये काश्मीरमध्ये कोणतेही मोठे आक्रमण का करण्यात आले नाही?,’ असे प्रश्न पाक सैन्याच्या अधिकार्यांकडून विचारण्यात आले. याला उत्तर देतांना म्होरक्यांनी आर्थिक चणचण असल्याचे कारण दिले. यावरून पाक सैन्याधिकारी आणि हे म्होरके यांच्यामध्ये वाद झाला. ‘खोटी कारणे न देता काश्मीरमध्ये घुसखोरी कशी करता येईल ? यासंदर्भातील माहिती द्यावी’, असे सैन्याधिकार्यांनी त्यांना सांगितले. या वादानंतर काही दिवसांनी पाक सैन्याकडून ‘ऑपरेशन ताशकीर-ए-जबल’ चालू करण्यात आले. डोंगराळ भागांमधील युद्ध अभ्यासाच्या नावाखाली हे ‘ऑपरेशन’ चालू करण्यात आले. याद्वारेच पाक सैन्याने हाफीज सईद याला धडा शिकवण्यासाठी त्याच्या घराबाहेर स्फोट घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प
US Attack on the Chabahar port : अमेरिकेचे इराणमधील भारताने विकसित केलेल्या चाबहार बंदरावर मोठे आक्रमण
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
China Uyghur Muslims : संस्कृती आणि भाषा नष्ट करण्याचे चीन सरकारचे कारस्थान असल्याचा आरोप
ED Investigation : भारतात बांगलादेशी आणि रोहिंग्या यांची घुसखोरी करण्यासाठी विदेशातून अर्थपुरवठा !