ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांचे त्यागपत्र !

कार्यालयामध्ये सहकारी मैत्रिणीचे चुंबन घेतल्याचे प्रकरण

ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी त्यांच्या कार्यालयामधील त्यांच्या सहकारी महिलेचे चुंबन घेतल्याने त्यांना त्यागपत्र द्यावे लागले आहे. या चुंबनाचा व्हिडिओ आणि छायाचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले. त्यानंतर लोकांनी मॅट हँकॉक यांच्यावर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्या त्यागपत्राची मागणी केली. शेवटी त्यांना त्यागपत्र द्यावे लागले. या महिलेनेही त्यागपत्र दिले आहे. मॅट हँकॉक यांनीच या महिलेला या मंत्रालयात अधिकारी म्हणून नियुक्त केले होते, तसेच वर्षातून केवळ १५ ते २० दिवसच काम करण्याची मुभा दिली होती. यावरून मॅट हँकॉक यांच्यावर विरोधी पक्षाने टीकाही केली होती.

मॅट हँकॉक यांनी त्यागपत्र देतांना म्हटले की, कोरोनाच्या संकटात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेकांनी नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी प्राणाची आहुती दिली आहे. यामुळे माझ्या हातून चूक झाल्यावर त्याविषयी मला प्रामाणिक असेल पाहिजे.