गोव्यात मद्यसेवनामुळे प्रतिवर्षी ३०० जणांचा मृत्यू

मद्यविक्रीतून कर मिळावा यासाठी रात्री उशिरापर्यंत मद्यालये चालू ठेवण्याचे हे आहेत दुष्परिणाम ! एकूण रुग्णांच्या २५ टक्के आणि त्यात २० वर्षे वयाचे तरुणही मद्यसेवन केल्याने उद्भवलेल्या रोगांनी ग्रस्त असणे ही गंभीर गोष्ट असून याविषयी आता जनतेनेच विचार करायला हवा !

(म्हणे) ‘मी जिवंत असेपर्यंत बस्तर जिल्ह्यात दारूबंदी होणार नाही !’ – छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारचे उत्पादन शुल्क मंत्री कवासी लखमा

असे मंत्री असतील, तर कधीतरी दारूबंदी किंवा लोकांचे दारूचे व्यसन दूर करण्याचा प्रयत्न होतील का ?

तळगाव (मालवण जि. सिंधुदुर्ग) येथे होणार्‍या गावठी मद्याच्या अवैध विक्रीवर तात्काळ कारवाई करा !

नागरिकांनी मागण्या किंवा आंदोलने केल्यावरच प्रशासन कृती करणार असेल, तर जनतेने कर भरून असे प्रशासन पोसायचे कशाला ? असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ?

गोवा : मडगाव रेल्वे परिसरात मध्यरात्री दारूच्या नशेत ३ गुंडांकडून महिलेवर प्राणघातक आक्रमण

या भागात ‘मथुरा’ नावाचे मद्यालय हे अवैध आहे. या मद्यालयाकडे अबकारी खात्याची अनुज्ञप्ती नाही. हे मद्यालय प्रतिदिन उत्तररात्री २-३ वाजेपर्यंत बिनदिक्कत चालू असते. याच मद्यालयाजवळ हे आक्रमण झाले आहे.

गोवा : अश्वे-मांद्रे किनारी भागातील अवैध पार्ट्या मांद्रे पंचायतीच्या सरपंचांनी बंद पाडल्या

अश्वे येथील ‘आजुले’ या क्लबसाठी पेडणे उपजिल्हाधिकारी कार्यालयाने तब्बल एक मासासाठी अनुज्ञप्ती दिली आहे. सरपंचानी याविषयी अप्रसन्नता व्यक्त करतांना ‘अशी अनुज्ञप्ती देणे कायद्यात बसते का ?’ याचे अन्वेषण करण्याची मागणी केली आहे.

दारूच्या सेवनामुळे ७ प्रकारच्या कर्करोगांचा धोका ! – जागतिक आरोग्य संघटना

युरोपीय देशांमध्ये ‘अल्कोहोल’च्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. ‘अल्कोहोल’मधील ‘इथेनॉल’ हा घटक जैविक प्रणालीच्या माध्यमातून कर्करोगाचे कारण बनतो.

गोवा राज्यात आत्महत्या करणार्‍यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक !

आत्महत्यांमागील कारणांचा अभ्यास करून त्या रोखण्यासाठी जनतेला साधना शिकवणे आवश्यक ! तसेच अमली पदार्थांच्या आहारी जाऊन आत्महत्या होण्याचे प्रमाण लक्षात घेऊन या समस्येचे समूळ उच्चाटन होण्यासाठी सरकारने कंबर कसली पाहिजे !

नशेची शोकांतिका !

या निमित्ताने येणारे प्रश्न अन् उघडे पडलेले प्रशासकीय, तसेच सामाजिक व्यवस्थांचे स्वरूप हेही संवेदनशील माणसाचे मन सुन्न करणारे आहे. सुसंस्कृत भारतात आता विदेशाप्रमाणे दारूच्या दुकानाबाहेर रांगाच्या रांगा पहायला मिळतात, ही शोकांतिका आहे.

दारूच्या वाहतुकीला आळा बसण्यासाठी जिल्ह्यात ४ पथके

थर्टीफर्स्टच्या पार्श्‍वभुमीवर परराज्यातून होणारी दारू वाहतूक, हातभट्टीत निर्मिती होणारी दारू, हातभट्टीची विक्री, गोवा बनावटीची दारू विक्री यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.

पर्यटनस्थळे आणि रस्त्यांवर हुल्लडबाजी करणार्‍यांवर कारवाई होणार ! – पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी

३१ डिसेंबरच्या रात्री जिल्ह्यात मद्यालये रात्री १ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची अनुमती दिली असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मद्यप्राशन करून वाहने चालवणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे.