तमिळनाडूत विषारी दारू पिऊन ३ लोकांचा मृत्यू !

चेन्नई (तमिळनाडू) – राज्यातील विल्लुपूरम् जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने ३ लोकांचा मृत्यू झाला, तर ११ लोकांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही घटना एकियारकुप्पम् गावात मासे पकडणार्‍यांच्या वस्तीमध्ये घडली. या प्रकरणी काही लोकांना कह्यात घेण्यात आले असून घटनेचे अन्वेषण केले जात आहे, अशी माहिती स्थानिक पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.