पुणे येथे ३१ डिसेंबरनिमित्त लाखो नागरिकांना दिले १ दिवस मद्यप्राशन करण्याचे परवाने !

सरकार असे परवाने देऊन एक प्रकारे समाजाला व्यसनीच बनवत आहे. नवीन वर्षाचे स्वागत चांगली कृती करून करायची कि मद्य प्राशन करून, हेही जनतेला कळत नाही, हे गंभीर आहे !

महाराष्ट्रात नाताळ आणि ३१ डिसेंबरला मध्यरात्री १ वाजल्यानंतरही मद्यविक्रीस सरकारची अनुमती !

त्यामुळे मद्याला विरोध करणार्‍या लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या तिन्ही दिवशी मध्यरात्रीनंतर मद्याची दुकाने उघडी रहाणार असल्यामुळे मद्यप्रेमींचा धुडगूस आणि ध्वनीप्रदूषण शहरात पहायला मिळणार आहे.

विषारी दारू पिऊन मरणार्‍यांना एक रुपयाही हानीभरपाई देणार नाही ! – बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची स्पष्टोक्ती

राज्यात गेली ६ वर्षे दारूबंदी असतांना राज्यात सर्रास दारू कशी मिळत आहे ?, याविषयी ते अपयशी का ठरले ? आणि ठरत आहेत ? तसेच यापुढे हे थांबवण्यासाठी ते काय करणार आहेत ?, हेही त्यांनी सांगायला हवे !

जे दारू पिणार, ते मरणार !

बिहारमधील छपरा जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला. या संदर्भात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी असे विधान केले !

दारूबंदीचे ढोंग लक्षात घ्या !

दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये पुन्हा एकदा दारूमुळे १२ जणांचा मृत्यू झाला आहे. आणखी १३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

बिहारमध्ये पुन्हा एकदा दारूमुळे १२ जणांचा मृत्यू

जनता दल (संयुक्त) आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या राज्यात नावालाच दारूबंदी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले !

नागपूर येथे मद्याच्या नशेत मालवाहतूक बोलेरो चालकाने अनेकांना उडवले !

मद्याच्या नशेत चालकाने भरधाव मालवाहतूक बोलेरो वाहन चालवत भाजीबाजारात अनेकांना उडवले. यात घटनेत ५ भाजी विक्रेते घायाळ झाले आहेत, तर एक दुचाकीचालक २०० मीटर फरफटत गेला.

राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाने ८७ लाखांचा मद्यसाठा केला शासनाधीन !

तळेगाव दाभाडे शहराच्या हद्दीत, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सापळा रचून ही कारवाई केली. वाहनचालक प्रवीण पवार आणि देविदास भोसले यांना कह्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे.

रत्नागिरी : ग्रामस्थांच्या विरोधामुळे ‘जनता दरबारात’ कोतवडे ग्रामदेवीच्या मंदिराजवळील ‘परमिट रूम’ ला प्रशासनाने अनुमती नाकारली !

‘ग्रामस्थांचा विरोध असेल, तर अनुमती देऊ शकत नाही’, प्रशासनाकडून दिलेल्या या निर्णयामुळे सर्व ग्रामस्थांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले.

गोवा राज्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात मद्याची अवैध वाहतूक केल्याच्या प्रकरणी सातार्डा येथे एकाला अटक

गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यायाने महाराष्ट्रात मद्याची अवैध वाहतूक करणार्‍यांवर थेट मकोका अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची चेतावणी महाराष्ट्राच्या राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या मंत्र्यांनी नुकतीच दिली होती. असे असूनही . . .