सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्‍यांवर कारवाई करणार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

भाजपचे आमदार दिगंबर कामत यांनी राज्यात वाढत्या अपघाताला अनुसरून ‘सरकार अपघात टाळण्यासाठी कोणती उपाययोजना करणार ?’ याविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.

मोपा, पेडणे येथे सनबर्न कार्यक्रम घेण्यास अनुज्ञप्ती देणार नाही ! – आमदार प्रवीण आर्लेकर, भाजप, गोवा 

पर्यटनाला चालना देतांना अमली पदार्थांच्या व्यवहारांना चालना मिळेल, असे कार्यक्रमही टाळले पाहिजेत. शासनाने चांगल्या मार्गाने महसूल मिळवण्याचा प्रयत्न केल्यास देवही त्यांना सहकार्य करील, यावर श्रद्धा ठेवावी !

गोवा : कळंगुट येथील बालग्रामसभेत विद्यार्थ्यांनी सार्वजनिक ठिकाणी होणार्‍या मद्यपानाच्या घटनांकडे लक्ष वेधले

जे विद्यार्थ्यांच्या लक्षात येते ते पंचायतीला का लक्षात येत नाही ? पुढील सभेपर्यंत तरी शाळांनी आणि पंचायतीने विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्या सोडवाव्यात !

शाळेमध्‍ये तंबाखू, मद्य सेवन केल्‍यास त्‍वरित कारवाई !

मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीमुळे असे निर्णय घ्‍यावे लागत आहेत, हे दुर्दैवी ! यासाठी शाळांमध्‍ये गुरुकुल शिक्षणपद्धतच हवी !

तिरूपत्तूर (तमिळनाडू) येथे प्रेयसीशी झालेल्या भांडणातून तरुणाने केली रेल्वेच्या सिग्नल बॉक्सची हानी !

असे कृत्य करणार्‍याला कठोरातील कठोर शिक्षा केली पाहिजे !

तमिळनाडूत विषारी दारू पिऊन ३ लोकांचा मृत्यू !

राज्यातील विल्लुपूरम् जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने ३ लोकांचा मृत्यू झाला, तर ११ लोकांना उपचारांसाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. ही घटना एकियारकुप्पम् गावात मासे पकडणार्‍यांच्या वस्तीमध्ये घडली.

पुणे येथे पोलीस कर्मचार्‍याच्‍या विरुद्ध गुन्‍हा नोंद !

असे मद्यपी आणि गुन्‍हेगार पोलीसकायदा आणि सुव्‍यवस्‍था कशी राखणार ?

गोव्यात मद्यसेवनामुळे प्रतिवर्षी ३०० जणांचा मृत्यू

मद्यविक्रीतून कर मिळावा यासाठी रात्री उशिरापर्यंत मद्यालये चालू ठेवण्याचे हे आहेत दुष्परिणाम ! एकूण रुग्णांच्या २५ टक्के आणि त्यात २० वर्षे वयाचे तरुणही मद्यसेवन केल्याने उद्भवलेल्या रोगांनी ग्रस्त असणे ही गंभीर गोष्ट असून याविषयी आता जनतेनेच विचार करायला हवा !

(म्हणे) ‘मी जिवंत असेपर्यंत बस्तर जिल्ह्यात दारूबंदी होणार नाही !’ – छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारचे उत्पादन शुल्क मंत्री कवासी लखमा

असे मंत्री असतील, तर कधीतरी दारूबंदी किंवा लोकांचे दारूचे व्यसन दूर करण्याचा प्रयत्न होतील का ?

तळगाव (मालवण जि. सिंधुदुर्ग) येथे होणार्‍या गावठी मद्याच्या अवैध विक्रीवर तात्काळ कारवाई करा !

नागरिकांनी मागण्या किंवा आंदोलने केल्यावरच प्रशासन कृती करणार असेल, तर जनतेने कर भरून असे प्रशासन पोसायचे कशाला ? असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ?