दारूच्या सेवनामुळे ७ प्रकारच्या कर्करोगांचा धोका ! – जागतिक आरोग्य संघटना

जिनिव्हा – दारूच्या सेवनामुळे ७ प्रकारच्या कर्करोगांचा धोका संभवतो, अशी चेतावणी जागतिक आरोग्य संघटनेने ‘द लान्सेट पब्लिक हेल्थ’ या मासिकात दिली. ‘दारूच्या पहिल्या थेंबापासून कर्करोगाचा धोका चालू होतो’, असेही संघटनेने स्पष्ट केले.

यात पुढे म्हटले आहे की, दारूच्या सेवनामुळे होणार्‍या कर्करोगांमध्ये मुख (तोंड), गळा, यकृत, अन्ननलिका, स्तन, मोठी आतडी आदींच्या कर्करोगांचा समावेश आहे. दारू शरिराची अत्यंत हानी करते. युरोपीय देशांमध्ये ‘अल्कोहोल’च्या सेवनामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढले आहे. ‘अल्कोहोल’मधील ‘इथेनॉल’ हा घटक जैविक प्रणालीच्या माध्यमातून कर्करोगाचे कारण बनतो. दारू किती महागडी किंवा किती अल्प प्रमाणात प्यायली, याच्याशी त्याचा अजिबात संबंध नाही.

संपादकीय भूमिका

आपल्या देशात मात्र गेल्या अनेक दशकांपासून दारू ‘सरकारमान्य’ म्हणून विकली जाते ! सरकार आता तरी दारूवर बंदी घालून जनहित साधणार का ?