नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या रस्त्यांवर ३५ सहस्र पोलिसांचा पहारा ! – विश्वास नांगरे पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त

नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोणतीही अप्रिय घटना टाळण्यासाठी, तसेच कोरोनाच्या नियमांचे काटेकोटरपणे पालन होण्यासाठी पोलिसांचे बारकाईने लक्ष असेल.

संयुक्त पुरोगामी आघाडीच्या नेतृत्वाविषयी शिवसेनेने सल्ला देऊ नये ! – अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाममंत्री

संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व सोनिया गांधी यांनी करावे, हे एकमताने मान्य केलेले आहे.

२५ वर्षांपूर्वी नगरसेविका म्हणून लक्षणीय काम केलेल्या प्राचार्या वैद्या रूपा शहा यांना ‘संत गाडगे महाराज समाजभूषण’ पुरस्कार प्रदान 

नगरसेवकांचे संपर्क कार्यालय असणे, हा पायंडा शहा यांनी पाडला आहे.

राज्यातील कारागृहातील अपप्रकार रोखण्यासाठी ‘ड्रोन’ यंत्रणा कार्यान्वित केली जाणार ! – सुनील रामानंद, अप्पर पोलीस महासंचालक (कारागृह)

गुन्हेगारांना सुधारण्यासाठी असणार्‍या यंत्रणेवरच लक्ष ठेवण्यासाठी जर ‘ड्रोन’चा वापर करावा लागणार असेल, तर यंत्रणेसाठी यापेक्षा दुर्दैव ते काय ?

मराठा आरक्षणात राज्य सरकारकडून घोडचुका झाल्या आहेत ! – विनायक मेटे, आमदार

सरकारच्या भूमिकेमुळे मराठा समाजाच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे आणि हे सरकार हा संभ्रम वाढवण्याचे काम जाणीवपूर्वक करत आहे.

कळंबा कारागृहाच्या अधीक्षकांचे स्थानांतर

कळंबा कारागृहात अज्ञातांनी पाऊण किलो गांजा, १० भ्रमणभाष, २ ‘पेन ड्राईव्ह’, ४ ‘चार्जर कॉड’ आणि चिकटवण्यासाठी वापरण्यात येणारे मिश्रण फेकले होते.

कोल्हापुरच्या सुभद्रा लोकल एरिया बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून रहित

कराड जनता सहकारी बँकेचा परवाना रहित झाल्यानंतर आता रिझर्व्ह बँकेकडून कोल्हापूर येथील सुभद्रा लोकल एरिया या बँकेचा परवाना रहित करण्यात आला आहे.

‘ॲमेझॉन’च्या कामात अडथळा न आणण्याचे न्यायालयाचे मनसेला निर्देश

‘ॲमेझॉन’ आस्थापन आणि त्यांचे कर्मचारी यांना त्यांचे काम करण्यापासून कोणत्याही प्रकारची अडवणूक करू नये,=दिंडोशी दिवाणी न्यायालय

उपसभापतिपदाच्या निवडणुकीत मतदान करणे सांविधानिक अधिकार नाही – राज्य सरकार

शिवसेना नेत्या नीलम गोर्‍हे यांची उपसभापतिपदी झालेली नियुक्ती कायदेशीर कि बेकायदेशीर याचा निर्णय ७ जानेवारीला देणार असल्याचे खंडपिठाने स्पष्ट केले.

भिवंडीतील काँग्रेसच्या १६ नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

सर्व नगरसेवकांनी भाजपला मदत केली म्हणून काँग्रेस पक्षाने त्यांना नोटीस दिली