संयुक्त शाहूपुरीच्या वतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज उत्सवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना !

संयुक्त शाहूपुरी संघटनेच्या वतीने आयोजित छत्रपतीसंभाजी महाराज उत्सवात १२ मे या दिवशी सायंकाळी छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली.

इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वराचे वरदान नाही !

‘इंग्रजांचे राज्य म्हणजे ईश्वराचे वरदान आहे. पूर्वेकडील राज्य म्हणजे अनागोंदी कारभार आहे’, असा प्रचार पाश्चात्त्य जगताकडून सातत्याने केला गेला. हा प्रचार किती खोटा आहे, हे लक्षात आणून देणारी उद्बोधक आणि उपयुक्त माहिती आपल्याला ठाऊक असली पाहिजे. त्यासाठीच हा लेख प्रपंच !

जगाच्या पाठीवर कुठूनही भक्तगण गोव्यातील कुलदेवतेची ‘व्हर्च्युअल’ पूजा करू शकणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे

मंगेशी, कवळे, रामनाथी, तांबडी सुर्ला येथील मंदिरांना प्रतिवर्ष अनेक पर्यटक भेट देतात. आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच याच परिसरातील पर्यावरणपूरक स्थानांना भेट देण्यासाठी योजना आहे.

प्रतिकार करणारा समाज उभा करणे, हे समर्थांना अभिप्रेत होते ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मराठवाड्यातील प्रख्यात शिवसमर्थ भक्त ‘श्री दादासाहेब जाधव’ यांना प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या शुभहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचा संक्षिप्त वृत्तांत . . .

‘मिरज विद्यार्थी संघा’च्या वसंत व्याख्यानमालेस २ मेपासून प्रारंभ !

मिरज विद्यार्थी संघाच्या ९८ व्या वसंत व्याख्यानमालेस २ मेपासून प्रारंभ होत आहे. १५ मे पर्यंत चालणार्‍या या व्याख्यानमालेचे उद्घाटन २ मे या दिवशी सायंकाळी ६.४५ वाजता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते होणार आहे.

आज इंदूरचे प्रसिद्ध संस्‍थापक मल्‍हारराव होळकर यांची तिथीनुसार पुण्‍यतिथी आहे. त्‍या निमित्ताने…

पेशवाईच्‍या मराठेशाहीतील सर्व घडामोडी आणि स्‍थित्‍यंतरे पाहून त्‍यांत प्रत्‍यक्ष भाग घेतलेला अनुभविक जुना सरदार या वेळी हा एकच होता आणि तो म्‍हणजे मल्‍हारराव होळकर !

इतिहासाचा अमूल्य ठेवा !

छत्रपती शिवाजी महाराजांचे संपूर्ण जीवनच प्रेरणादायी आहे. त्यांनी अफझलखानाचा बाहेर काढलेला कोथळा, अनेक बलाढ्य मोगल राजांची उडवलेली धूळधाण, पाच पातशाह्यांचा केलेला नायनाट आदी सर्व हिंदूंमध्ये क्षात्रतेजाचे स्फुलिंग चेतवणारे आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘वाघनखे’ आणि ‘जगदंबा तलवार’ परत करण्याविषयी ब्रिटीश उपउच्चायुक्तांकडून सकारात्मक प्रतिसाद ! – सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक कार्यमंत्री

ब्रिटिशांनी लुटून नेलेल्या या दोन्ही गोष्टींना ७५ वर्षांनंतर भारतात आणावे लागत असेल, हे तर केवळ मतांसाठी छत्रपती शिवरायांच्या नावाचा उदोउदो करणार्‍या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद आहे !

आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सावरकरवाड्यात मांडली जाणार वीरगाथा !

तंत्रज्ञानाचा संपूर्ण वापर करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा इतिहास नव्या पिढीला दाखवावा. भगूर या गावात प्रवेश करताच स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जीवनपट समोर यावा, असे काम करण्याची सूचना या वेळी मुनगंटीवार यांनी अधिकार्‍यांना दिली.

महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा विकास करणार ! – छत्रपती उदयनराजे भोसले

१० एप्रिल या दिवशी संगम माहुली येथील महाराणी येसूबाई यांच्या समाधीचे दर्शन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी घेतले. यानंतर ते प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते.