हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नूतन वर्ष गुढीपाडव्याला साजरे करण्याविषयी’ ‘ऑनलाईन’ कार्यक्रमातून जागृती

‘हिंदु धर्म अन् संस्कृती यांवर होत असलेले आघात आणि ते आघात रोखण्यासाठी हिंदूंनी धर्माभिमान वाढवण्याची आवश्यकता’

दुष्ट व्यक्तीविषयी शास्त्रवचन

जसे थकलेला हत्तींचा राजा सावलीसाठी वृक्षाचा आश्रय घेतो आणि विश्राम झाल्यानंतर त्याच वृक्षाचा नाश करतो, तसेच नीच (दुष्ट) मनुष्य स्वतःला आश्रय देणार्‍याचा सुद्धा (कृतघ्नपणे) नाश करतो.

सात्त्विकता आणि वात्सल्यता यांचा संदेश देण्यासाठीच श्रीदत्त अवतार ! – सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी

ईश्‍वर हा विषय सर्वांना समजावा, अनुभवता यावा, यासाठी या सगुण साकार रूपात देव अवतरित झाले, असे श्रीदत्त पद्मनाभ पिठाचे पिठाधीश्‍वर धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांनी मार्गदर्शनपर आशीर्वचन केले.

शिरोडा (गोवा) येथील श्री शिवनाथदेवाचा जत्रोत्सव

गोव्यातील फोंडा तालुक्यातील शिरोडा येथील शिवनाथ देवस्थान, हे शिरोड्यातील सर्वांत जुने देवस्थान आहे. प्रत्येक गावात त्या गावचे आद्य रहिवासी असतात, त्याचप्रमाणे ग्रामदेवताही असतात. शिरोड्यातही अशा १३ ग्रामदेवतांचे वास्तव्य आहे.

३१ डिसेंबरच्या रात्री ‘न्यू ईअर पार्टी’द्वारे नववर्षाचे स्वागत करणार्‍यांवर तेथील वातावरणाचा झालेला नकारात्मक परिणाम

निसर्गनियमाला अनुसरून केलेल्या गोष्टी मानवाला पूरक असतात, तर विरुद्ध केलेल्या गोष्टी मानवाला हानीकारक असतात. यास्तव पाश्‍चात्त्य संस्कृतीनुसार १ जानेवारीला नव्हे, तर गुढीपाडव्यालाच नववर्षारंभ साजरा करण्यातच आपले खरे हित आहे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘सत्ययुगात नियतकालिके, दूरचित्रवाहिन्या, संकेतस्थळे इत्यादींची आवश्यकताच नव्हती; कारण वाईट बातम्या नसायच्या आणि सर्वजण भगवंताच्या अनुसंधानात असल्याने आनंदी होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

वटवृक्ष स्वामी मंदिरात श्रीदत्त जन्मोत्सव भक्तिभावाने साजरा

कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम आणि पालखी सोहळा रहित

तासगाव (जिल्हा सांगली) येथे श्री दत्त जयंती निमित्ताने ‘ऑनलाईन’ प्रवचन

दत्तगुरूंच्या जन्माचे रहस्य, दत्ताची उपासना का करावी ?, ती कशी करावी, त्याचे आपल्या आयुष्यामध्ये होणारे लाभ यांवर मार्गदर्शन.

वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार ह.भ.प. अनंत इंगळे महाराज यांचा ‘श्री दत्तरत्न पुरस्कार’ देऊन सन्मान !

अनंत इंगळे महाराज हे वारकरी संप्रदायातील दीपस्तंभ असून निष्काम सेवेचा आदर्श आहेत.

हिंदु संस्कृतीनुसार नववर्ष गुढीपाडव्याला साजरे करा ! – दत्तात्रय पिसे, हिंदु जनजागृती समिती

पू. बापूंचे शिष्य कर्तव्य म्हणून धर्मरक्षण, संस्कृती रक्षण आणि समाजात चांगले संस्कार रुजवण्याचे चांगले कार्य करत आहेत.