
तासगाव (जिल्हा सांगली), ३० डिसेंबर (वार्ता.) – येथील धर्मप्रेमींसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ डिसेंबर या दिवशी ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनात हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजाराम रेपाळ यांनी दत्तगुरूंच्या जन्माचे रहस्य, दत्ताची उपासना का करावी ?, ती कशी करावी, त्याचे आपल्या आयुष्यामध्ये होणारे लाभ, अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केले. याचा लाभ २५० हून अधिक धर्मप्रेमींनी घेतला.
क्षणचित्रे
१. या प्रवचनासाठी १२० हून अधिक धर्मप्रेमी पहिल्यांदाच जोडले होते.
२. याचा प्रसार सौ. वैजयंता जाधव आणि अन्य धर्मप्रेमी यांनी उत्स्फूर्तपणे केला.
काही उपस्थित धर्मप्रेमींचे अभिप्राय

१. सौ. सुरेखा जाधव, पळशी – प्रवचन ऐकतच रहावे, ते संपूच नये, असे वाटत होते.
२. श्री. शंकर पाटील, कुमठे – अशी प्रवचने सातत्याने व्हायला हवी.
३. सौ. विद्याताई गायकवाड, शेटफळे – या अगोदर अनेक सत्संग ऐकले; पण आजचे मार्गदर्शन वेगळे होते. त्यातून पुष्कळ शिकायला मिळाले.
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन