‘फेसबूक’ला हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि मान्यवर यांच्या ‘पेज’वरील बंदी उठवण्यास भाग पाडा !

पनवेल (रायगड) येथील धर्मप्रेमी श्री. गिरीश ढवळीकर यांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे आवाहन !

#Facebook_Targets_HJS हॅशटॅग राष्ट्रीय स्तरावर तृतीय स्थानावर !

फेसबूककडून हिंदुत्वनिष्ठ आणि त्यांच्या संघटना यांच्या पानांवर घातलेल्या बंदीचा राष्ट्र अन् धर्म प्रेमी यांच्याकडून ट्विटरवरून विरोध !

फेसबूकच्या हिंदुद्वेषामागे अमेरिकेतील ‘टाइम’ नियतकालिकाचा हात !

हिंदु जनजागृती समिती, सनातन प्रभात नियतकालिके आणि सनातन शॉप यांच्या फेसबूक पानांवरील मजकुराची वस्तुनिष्ठ शहानिशा न करताच फेसबूककडून ही अन्याय्य कारवाई करण्यात आली, हे लक्षात घ्या !

हिंदु धर्मादाय विभागाकडून हिंदूंव्यतिरिक्त अन्य धार्मिक स्थळांना आर्थिक साहाय्य देणे बंद ! – कर्नाटक शासनाचा आदेश

हिंदूंच्या धार्मिक विभागाकडून अन्य धर्मियांना पैसे देणे, हा हिंदूंवर अन्याय होता आणि तो आतापर्यंत करणार्‍यांकडून देण्यात आलेला पैसा वसूल केला पाहिजे !

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे भूमीपूजन

आमदार आणि प्राधिकरण सदस्य राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले.

कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने शिवराज्याभिषेकदिन सोहळा उत्साहात !

श्री. राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेकदिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.

फेसबूककडून आता हिंदु जनजागृती समितीचे ‘हिंदी’ पानही बंद !

फेसबूकचा हिंदुद्वेष पहाता उद्या त्याने सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि नेते यांची पाने बंद केली, तर आश्‍चर्य वाटू नये ! हिंदु जनजागृती समिती आज जात्यात आणि अन्य सुपात असल्यामुळे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी संघटित होऊन फेसबूकचा वैध मार्गाने प्रखर विरोध केला पाहिजे !

नगर शहराचे नाव ‘अंबिकानगर’ करण्यात यावे ! – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना

राज्य सरकारने विदेशी आक्रमकांनी ठेवलेली नावे पालटून शहरांना प्राचीन हिंदु नावे द्यायला हवीत !

२८ मे या दिवशी होणारा स्वातंत्र्यवीर सावरकर भक्त मेळावा आणि पुरस्कार सोहळा स्थगित

सावरकर भक्तांनी २८ मे या दिवशी आपल्या घरी सावरकर जयंती साजरी करावी. तसेच स्वातंत्र्यवीरांना अभिवादन केल्याची छायाचित्रे किंवा ध्वनिचित्रीकरण ९८२२८ ०१९७३ या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावेत.

लोकांनी थुंकू नये म्हणून जिन्यात लावलेल्या हिंदु देवतांच्या चित्रांवर हिंदुत्वनिष्ठांनी पांढरा रंग दिला !

हिंदु देवतांची विटंबना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे श्री. अमोल चेंडके अन् श्री. राजू कोपार्डे यांचे अभिनंदन !