तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे भूमीपूजन

 श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने…

भूमीपूजनासाठी उपस्थित महंत, हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – आमदार आणि प्राधिकरण सदस्य राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने ६ जून या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन करण्यात आले. येथे १० मीटर उंचीचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे.

या वेळी येथील महंत तुकोजीबुवा, महंत इच्छागिरी महाराज, महंत मावजीनाथ महाराज, महंत व्यंकट अरण्य महाराज, नगरपालिका अध्यक्ष सचिन रोचकरी यांसह श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, शिवबाराजे प्रतिष्ठान, छावा संघटना यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.