देहली येथे घरी पूजा करतांना घंटी आणि शंख वाजवल्याने शेजारील धर्मांधांकडून हिंदु कुटुंबाला ठार मारण्याची धमकी !

  • धर्मांधांची संख्या वाढल्याचा हा परिणाम असल्याचे हिंदु कुटुंबाचे मत !

  • पोलिसांकडून गुन्हा नोंद नाही !

  • अल्पसंख्यांकांच्या लोकसंख्येत वाढ झाल्यावर बहुसंख्य हिंदूंच्या संदर्भात जे घडत आले आहे, तेच या घटनेतही झाले, हे लक्षात घ्या ! – संपादक
  • ठार मारण्याची धमकी देण्यात आली असतांनाही पोलिसांकडून गुन्हा नोंद न होणे आश्‍चर्यजनकच होय ! ‘पोलिसांचा धर्मांधांना पाठिंबा आहे का ?’ असा प्रश्‍न उपस्थित होतो. देहली पोलीस केंद्रीतील भाजप सरकारच्या नियंत्रणात असल्याने सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक
प्रतिकात्मक छायाचित

नवी देहली – येथील मदनपूर खादर एक्सटेंशन भागात वास्तव्य करणारे रोशन पाठक हे त्यांच्या घरात पूजा करत होते. त्या वेळी घंटी आणि शंख वाजवल्याने दानिश नावाच्या धर्मांध शेजार्‍याने पाठक यांना घरात घंटी आणि शंख वाजवणे बंद करण्यास सांगितले. ‘यामुळे झोपमोड होते’, असे तो म्हणाले. त्याने अन्य धर्मांधांना तेथे बोलावले आणि विरोध केला. तसेच ‘यापुढे घंटी आणि शंख वाजवला, तर ठार मारू’, अशी धमकीही धर्मांधांनी दिली. याविषयी त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतरही अद्याप पोलिसांनी गुन्हा नोंदवलेला नाही. (असे पोलीस भारताचे कि पाकचे ? – संपादक) या प्रकरणी हिंदु संघटनांनी रोशन पाठक यांना साहाय्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

रोशन पाठक येथील मदनपूर खादर एक्सटेंशन भागात गेल्या २४ वर्षांपासून रहात आहेत; मात्र गेल्या ३ वर्षांत या परिसरात धर्मांधांची लोकसंख्या वाढू लागल्याने आणि हिंदूंची संख्या अल्प झाल्यामुळे पूजा करण्यास विरोध होऊ लागला आहे, अशी माहिती त्यांनी दिली.