बायणा येथील मंदिराच्या पुजार्‍याला मारहाण करणार्‍यांवर कारवाई करा, अन्यथा पोलीस ठाण्यावर मोर्चा आणू !

या प्रकरणी तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या तक्रारदारांना संबंधित पोलिसांनी संतापजनक वागणूक  दिली. या वेळी पोलीस आसंदीवर पाय ठेवून तक्रारदारांशी बोलत होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आजपासून नागेशी (गोवा) येथे अखिल भारतीय स्तरावरची ‘समन्वय बैठक’

नागेशी, फोंडा येथे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची संघाचे काही प्रमुख अखिल भारतीय पदाधिकारी आणि निवडक संघ प्रेरित विविध संघटनांचे पदाधिकारी यांची अखिल भारतीय स्तरावरची ‘समन्वय बैठक’ होणार आहे.

म्हादई नदीचे पाणी कर्नाटकमध्ये वळवण्यासाठी काँग्रेसचा पाठिंबा !

लोकांनी म्हादईचे स्वप्न काँग्रेसद्वारे पहावे ! म्हादईप्रश्नी गोव्यात तीव्र असंतोष असतांनाही काँग्रेस पक्षाने कर्नाटक येथे होणार्‍या विधानसभेच्या निवडणूक घोषणापत्रात म्हादईचा केलेला उल्लेख !

म्हादईप्रश्नी केंद्रावर दबाव आणण्यासाठी भाजप राज्यभर स्वाक्षर्‍यांची मोहीम राबवणार

म्हादईच्या प्रश्नावर शिष्टमंडळ नेण्यासंबंधी असो किंवा केंद्रीय मंत्र्यांकडे कोणताही पत्रव्यवहार करण्यासंबंधी असो, राज्य सरकार जो काही निर्णय घेईल, त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे.

आम्हाला गोवा रोखू शकत नाही ! – कर्नाटकचे जलस्रोतमंत्री गोविंद करजोळ

म्हादईवरील अभ्यास अहवालाला संमती देण्यासाठी ऑगस्ट २०२३ पर्यंत कार्यकाळ असतांना ‘डी.पी.आर्.’ला संमती देणे योग्य नव्हे. होणार्‍या परिणामांचा सखोल अभ्यास करणे आणि तिन्ही राज्यांच्या सक्रीय सहभागाने धोरण निश्चित करणे आवश्यक आहे.

सिंधुदुर्ग : बांदा येथे ८ जानेवारीला होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रचारकार्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंचा प्रचारकार्याला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पहाता ही सभा निश्चितच यशस्वी होणार आहे, असा दृढ विश्वास हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी व्यक्त केला आहे.

सणांच्या काळात अतिरिक्त दर आकारून प्रवाशांना लुटणार्‍या ‘बस ऑपरेटर्स’वर नियंत्रण ठेवा !

अशी मागणी का करावी लागते ? प्रवाशांची लूट होते, हे वाहतूक खात्याच्या लक्षात का येत नाही ?

म्हादईची लढाई सर्वाेच्च न्यायालयात लढणार : गोवा मंत्रीमंडळ सज्ज !

म्हादई पाणी वाटपावरून संघटित न होता सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घालणारे विरोधी नेते कधी जनहित साधतील का ?

दक्षिण गोव्यात १ वर्षात बलात्काराची ३५ प्रकरणे नोंद

महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, तसेच बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा झाल्यासच असे प्रकार थांबतील !

म्हादई जलवाटप तंटा

म्हादई नदीचे पाणी कळसा आणि भंडुरा येथे उभारण्यात येणार्‍या धरणांच्या माध्यमातून मलप्रभा नदीत वळवण्यासाठी केंद्रीय जल आयोगाने कर्नाटक सरकारला संमती दिल्याने गोव्यात तीव्र असंतोष उमटला आहे.