दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यांसह गोवा राज्यातही व्यापक प्रचार
बांदा – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध असलेल्या हिंदु जनजागृती समितीने सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथील खेमराज हायस्कूलच्या पटांगणात रविवार, ८ जानेवारी २०२३ या दिवशी सायंकाळी ५ वाजता हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन केले आहे. या सभेचा सिंधुदुर्ग जिल्हा आणि गोवा राज्य येथे विविध स्तरांवर चालू असलेला प्रचार आता अंतिम टप्प्यात पोचला आहे.
राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंचा प्रचारकार्याला मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पहाता ही सभा निश्चितच यशस्वी होणार आहे, असा दृढ विश्वास हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. हेमंत मणेरीकर यांनी व्यक्त केला आहे.
प्रचारकार्याविषयी माहिती देतांना श्री. मणेरीकर यांनी सांगितले की,
१. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला या तालुक्यांसह गोवा राज्यातील म्हापसा, डिचोली, सांखळी, पेडणे, पर्वरी, कासारपाल, नानोडा, अस्नोडा, शिरसई आदी भागांत या सभेचा प्रचार चालू आहे.
२. सभेला उपस्थित रहाता यावे, यासाठी गोवा राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा येथील हिंदुत्वनिष्ठ स्वयंप्रेरणेने वाहनांचे नियोजन करत आहेत, तसेच स्वयंस्फूर्तीने सभेचा प्रचार करत आहेत.
प्रसारकार्यातील वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
१. श्री देव रवळनाथ मंदिरात ‘हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी आणि सभेला अधिकाधिक हिंदूंनी उपस्थित रहावे’, यासाठी साकडे घालण्यात आले.
२. बैठकांना उपस्थित अनेक धर्मप्रेमींनी स्वतः समितीच्या उपक्रमांची, तसेच धर्मावरील आघातांची माहिती करून घेतली.
३. अनेक ठिकाणी स्वसंरक्षणवर्ग, धर्मशिक्षणवर्ग, बालसंस्कारवर्ग चालू करण्याची मागणी करण्यात आली.