भारताला विश्वगुरुपदी नेण्यासाठी बलसंपन्न समाजाची निर्मिती आवश्यक ! – सरसंघचालक

भारताला ओळखा, भारताला जाणा आणि भारतीय व्हा. भारत हे हिंदु राष्ट्र आहे. सर्व भाषा, सर्व पंथ, उपपंथ सर्वांचा सन्मान करा. सर्वांप्रती सद्भावना ठेवा. रा.स्व. संघाचे कार्य दुरून न पहाता संघाच्या कार्यात सहभागी व्हा आणि संघाचे कार्य जवळून जाणून घ्या.

बांदोडा, फोंडा येथील कु. गौरी दीपक ढवळीकर बनली वैमानिक (पायलट) !

कु. गौरी दीपक ढवळीकर ही इंडिगो विमान आस्थापनात वैमानिक म्हणून निवडली गेली आहे. कु. गौरी ही माजी आमदार श्री. दीपक ढवळीकर आणि सौ. लता दीपक ढवळीकर यांची कन्या, तर वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांची पुतणी आहे.

‘पर्पल फेस्ट’चे पणजी येथे उद्घाटन

‘‘अशा महोत्सवाच्या आयोजनामुळे विकलांग  व्यक्तीमध्ये आत्मबळ वाढण्यास, तसेच समाजात विकलांगांच्या सशक्तीकरणाविषयी जागृती होण्यास साहाय्य होते.’’

कचरा व्यवस्थापनामध्ये भ्रष्टाचार होत असून २० सहस्र रुपयांचे काम करून ६० सहस्र रुपये घेतले जातात ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

तळागाळात फोफावलेला भ्रष्टाचार आणि नागरिकांना नसलेली शिस्त, हेच कचरा व्यवस्थापन योग्यरित्या न होण्याचे कारण आहे !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात कन्‍नड भाषेतील साधना शिबिराला आरंभ

सनातन संस्‍थेच्‍या वतीने येथील सनातनच्‍या आश्रमात ६ जानेवारी २०२३ या दिवशी कन्‍नड भाषेतील साधना शिबिराला चैतन्‍यमय वातावरणात आरंभ झाला. शिबिराच्‍या प्रारंभी शंखनाद करण्‍यात आला.

प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपजिल्हाधिकारी आणि पोलीस यांची दायित्व एकमेकांवर ढकलण्याची वृत्ती लज्जास्पद ! – उच्च न्यायालय

‘सनबर्न’ महोत्सवात ध्वनीप्रदूषण होऊनही ते रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ, उपजिल्हाधिकारी किंवा पोलीस यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत – उच्च न्यायालय

सर्वाेच्च न्यायालयात गोव्याच्या अर्जांवर आज सुनावणी झालीच नाही !

म्हादईप्रश्नी प्रलंबित अर्जांवर तातडीने सुनावणी घेण्यासाठी सर्वाेच्च न्यायालयाकडे आग्रह धरण्यास गोवा सरकारला अपयश आल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

मुंबई येथील स्‍वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांची महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्राला भेट !

महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाचे कार्य पुष्‍कळ चांगले ! – स्‍वराधीश डॉ. भरत बलवल्ली

म्हादई प्रश्नावरून तृणमूलचा मोर्चा, तर ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ची राज्यव्यापी आंदोलनाची चेतावणी

तृणमूल काँग्रेसने ४ जानेवारी या दिवशी पणजी येथे निषेध मोर्चा काढला, तर १६ जानेवारीपर्यंत केंद्राने प्रकल्पाला दिलेली मान्यता रहित न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याची चेतावणी ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ या संघटनेने दिली आहे.

पुरावे गोळा करून गोव्याची बाजू सर्वाेच्च न्यायालयात भक्कम करा ! – पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर

म्हादई जलतंटा लवादाच्या निर्णयाचे वर्ष २०४८ मध्ये पुनरावलोकन केले जाणार आहे. गोवा राज्याने आपली बाजू आताच भक्कम न केल्यास गोवा राज्य म्हादईचे आणखी पाणी गमावून बसू शकते.