बनावट देयके करणार्यांना कठोर शिक्षा त्वरित झाल्यासच अशा घटना पुन्हा घडणार नाहीत.
पुणे – वस्तू आणि सेवाकर (जी.एस्.टी.) भरायला लागू नये म्हणून बाबूशा शरणप्पा कसबे या व्यापार्याने अनुमाने ११० कोटी रुपयांची बनावट देयके सादर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कसबे यांना अटक केली असून न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कसबे यांचे खुशी ट्रेडर्स नावाचे भंगार मालाचे आस्थापन आहे. त्यांनी बनावट देयके सादर करून १६ कोटी ८७ लाख रुपयांचा इनपूट टॅक्स क्रेडिट प्राप्त केला आहे. अशा प्रकारच्या अन्य बोगस आस्थापनांची माहिती मिळाली असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार असल्याचे जी.एस्.टी. विभागाचे उपायुक्त दत्तात्रय आंबेराव यांनी सांगितले.