पतंजलि, डाबर, झंडू, बैद्यनाथ आदी १३ मोठी आस्थापने मधाच्या नावाखाली साखरेचा पाक विकतात ! – सी.एस्.ई.चा दावा

पतंजलि आणि डाबर यांनी या चाचणीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. पतंजलि चे म्हणणे आहे की, नैसर्गिकरित्या मध बनवणार्‍या आस्थापनांच्या अपकीर्तीचा हा प्रयत्न आहे !, तर डाबर चे म्हणणे आहे की, जो अहवाल समोर आला आहे, तो प्रायोजित आहे !

एकजुटीने देशस्वार्थ साधा रे !

भारतियांनी निदान शत्रूराष्ट्राचा पराभव करण्यासाठी तरी एकजुटीने त्यांच्या उत्पादनांवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याची कडक प्रतिज्ञा करत तिचे आचरण केले पाहिजे. असे करणे, हे सैन्य आणि शासन यांना मोठे साहाय्य असेल.

केंद्रशासनाकडून ‘अँटी मलेरिया’ (मलेरिया प्रतिबंधक) औषधावर निर्यातबंदी !

देशात कोरोनाचा सामना करण्यासाठी ‘हायड्रोक्सी क्लोरोक्वीन’ या ‘अँटी मलेरिया’ (मलेरिया प्रतिबंधक) औषधाची निर्यात बंद करण्यात आली आहे. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये हे औषध कोरोनाच्या विरोधात प्रभावी ठरत आहे.