केंद्रशासनाकडून ‘अँटी मलेरिया’ (मलेरिया प्रतिबंधक) औषधावर निर्यातबंदी !

नवी देहली – देशात कोरोनाचा सामना करण्यासाठी ‘हायड्रोक्सी क्लोरोक्वीन’ या ‘अँटी मलेरिया’ (मलेरिया प्रतिबंधक) औषधाची निर्यात बंद करण्यात आली आहे. प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये हे औषध कोरोनाच्या विरोधात प्रभावी ठरत आहे. त्यामुळे या औषधाची मागणी वाढू शकते. हाच भाग लक्षात घेऊन केंद्रशासनाने एक अ‍ॅडव्हायजरी प्रसिद्ध करत ‘अँटी मलेरिया’ औषधावर निर्यातबंदी केल्याचा निर्णय घोषित केला आहे. यासंबंधीचे वृत्त ‘न्यूज १८’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. या अ‍ॅडव्हायजरीनुसार नोंदणीकृत डॉक्टरने ‘प्रिस्क्रिप्शन’वर (चिठ्ठीवर) लिहिले असेल, तरच वरील औषध मिळू शकते. तसेच १५ वर्षांच्या आतील मुलांवर हे औषध वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.