मनुष्यादी प्राण्यांच्या अनेक व्याधींना निमंत्रण देणारी अनैसर्गिक शेती करू नका !
शेती म्हणजे साप, विंचू, गांडुळे, मुंग्या, मुंगळे, भूमीतील सूक्ष्म जीव, मासे, खेकडे, बेडूक, पशू-पक्षी, वनस्पती या सर्वांची परिसंस्था (इको सिस्टिम) आहे. या परिसंस्थेला बाधा पोचली की, सर्व अन्नसाखळी कोलमडणार. एकदा साखळी तुटली, तर ती परत जोडणे माणसाच्या आवाक्यातील नाही.