शेतकऱ्यांनो, विनाहंगामी शेती ही निसर्गानुकूल नव्हे !

हंगाम नसतांना आंबा-रसपुरीचे जेवण घेणे प्रतिष्ठेचे असले, तरी ते प्रकृतीला हानीकारक ठरते. प्रकृतीचा विचार न करता विनाहंगाम होणारी फळे आणि भाजीपाला यांची अधिक मागणी अन् त्याला मिळणारा बाजारभाव यांमुळे असे उत्पादन काढण्याची शेतकऱ्यांत स्पर्धाच आहे. त्याचे शेतीवर पुढील दुष्परिणाम होतात.

१. विनाहंगामी शेतीला निसर्ग साथ देत नाही. त्यामुळे अशा पिकांवर विविध प्रकारचे रोग आणि कीड यांचा संसर्ग होतो. त्यामुळे रोगनाशके आणि कीटकनाशके यांची मोठ्या प्रमाणात फवारणी केली जाते अन् अप्रत्यक्षपणे प्रदूषणाचे प्रमाण वाढते.

२. बागेत न्यूनतम ५ प्रतिशत झाडे निरनिराळ्या प्रकारची, म्हणजेच निरनिराळ्या हंगामात फुलणारी आणि फळणारी असावीत. यामुळे परागीभवनास साहाय्य करणाऱ्या मधमाश्या किंवा भूंगे यांसारख्या कीटकांना वर्षभर खाद्य आणि आश्रय एकाच ठिकाणी उपलब्ध होतो, तसेच उपद्रवी कीटकांचे प्रमाण वाढल्यास त्यांचाही परस्पर बंदोबस्त होतो. विनाहंगामी उत्पादनांमुळे एकाच जातीची फळझाडे लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे.

– मोहन बारी. (‘दैनिक लोकसत्ता’, ५.६.१९९९)