अभिमंत्रित पाणी वापरून अधिक टोमॅटो येणे !

‘५० फूट बाय ५० फूट दक्षिणोत्तर भूखंडामध्ये टोमॅटोच्या साठ साठ रोपांचे आरोपण केले. एका भूखंडास ३०० ग्रॅम सुपरफॉस्फेट, १५० ग्रॅम अमोनियम सल्फेट, ७५ ग्रॅम सोडियम नायट्रेट आणि ३ किलो शेणखत दिले गेले. दुसऱ्या भूखंडास कोणत्याही प्रकारचे खत न देता केवळ अभिमंत्रित पाणी दिले गेले. साडेतीन मासांनंतर दोन्ही भूखंडांतील उत्पन्नांची तुलना केली. त्यात रासायनिक अन् शेणखत दिल्या गेलेल्या भूखंडामधून २२.५ किलो टोमॅटो मिळाले. दुसऱ्या भूखंडामधून ज्यास कोणत्याही प्रकारचे खत दिलेले नव्हते, केवळ अभिमंत्रित पाणी दिलेले होते, त्यातून ४८ किलो टोमॅटो मिळाले. असाच प्रयोग काकडीच्या संदर्भात केला, तेव्हा रासायनिक खताने १६ किलो, तर अभिमंत्रित पाण्याने ४० किलो काकड्या आल्या, रासायनिक खताने ३५ किलो वांगी, तर अभिमंत्रित पाण्याने ७० किलो वांगी आली.

– मंत्रमहर्षी, वैद्य श्री. भाऊसाहेब देशपांडे (दै. ‘नवशक्ती’, २५.१.१९७६)