शेतात आध्यात्मिक उपाय करून सर्वकाही श्रीकृष्णावर सोपवल्यावर आलेल्या अनुभूती !

भाताची लागवड (पेरणी) करण्यास २ दिवस लागणार होते. सर्वांनी नामजप करत पेरणी केल्याने एकच दिवस लागला. रात्री श्रीकृष्णाला प्रार्थना केल्यावर ‘त्याचे सुदर्शनचक्र शेताच्या भोवती फिरत आहे’, असे दिसत होते.

शेती ‘साधना’ म्हणून केल्याने देवाचे साहाय्य मिळून शेतात अपेक्षेहून अधिक फलप्राप्ती होते, हे अनुभवणारे पू. शंकर गुंजेकर !

श्री. शंकर गुंजेकरमामा (आताचे पू. शंकर गुंजेकरमामा) यांची शेती आहे. ‘ते त्यांची शेती साधना म्हणून करत असल्याने त्यांना देवाचे साहाय्य मिळते’, हे दर्शवणाऱ्या काही अनुभूती पुढे दिल्या आहेत.