मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी समन्वयाने काम करा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दोन्ही महामार्गावरील बायपास, सर्व्हिस रोड यांचे मजबूतीकरण करून गणेशोत्सवापूर्वी दोन्ही महामार्ग खड्डेमुक्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील काही महिलांना वर्षाला ३ गॅस सिलिंडर विनामूल्य मिळणार !

अडीच कोटी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार असला, तरी दीड कोटी कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळेल. सरकारवर वार्षिक चार ते साडेचार सहस्र कोटींचा बोजा पडण्याची शक्यता आहे.

पुणे येथे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत !

२४ जुलैला रात्री भिडे पूल आणि टिळक पूलही पाण्याखाली गेला आहे. गरवारे कॉलेजमधील खिल्लारे वस्ती आणि संगम पुलासमोरील वस्तीत पाणी गेले आहे.

पुणे येथे ढगफुटीसदृश्‍य पाऊस झाल्‍यामुळे जनजीवन विस्‍कळीत !

पुण्‍यात गेल्‍या २४ घंट्यांत ३७० मि.मी. पाऊस पडला. डेक्‍कन रोड येथील पुलाची वाडी परिसरात असलेल्‍या वस्‍त्‍यांमध्‍ये मध्‍यरात्री ३ वाजता पाणी शिरल्‍याने रहिवाशांची तारांबळ उडाली.

अर्थसंकल्पावरील प्रतिक्रिया

मध्यमवर्गाला लाभ देत भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प आहे. युवा, गरीब आणि शेतकर्‍यांना डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आलेला संतुलित अर्थसंकल्प आहे.

राज्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या आपत्ती विभागाला सूचना !

या पार्श्वभूमीवर एस्.डी.आर्.एफ्., जिल्हा प्रशासन, पोलीस, महापालिका, नगरपालिका आदी विविध स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सतर्क रहावे आणि नागरिकांना सर्वतोपरी साहाय्य करावे, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला, ही हिंदवी स्वराज्य स्थापनेतील सर्वांत मोठी घटना ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लंडनच्‍या ‘व्‍हिक्‍टोरिया अँड अल्‍बर्ट वस्‍तूसंग्रहालया’तून छत्रपती शिवरायांची ‘वाघनखे’ महाराष्‍ट्रात पोचली आहेत. ही वाघनखे १९ जुलैपासून सातार्‍यात प्रदर्शनासाठी ठेवली आहेत.

कुणावरही अन्याय्य कारवाई होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवणार ! – मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. ती हटवण्यासाठी प्रशासनाने समयसमर्यादेत कारवाई केली नाही. त्यामुळे शिवप्रेमींचा उद्रेक झाला.

छत्रपती शिवरायांची वाघनखे सातार्‍यात पोचली !

शासनाने ही ऐतिहासिक वाघनखे कायमस्वरूपी भारतात रहाण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे !

शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य यांच्या जीवनात समृद्धी येण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलचरणी साकडे !

आषाढी एकादशीनिमित्त येथील वातावरण भक्तीमय झाले होते. ‘विठ्ठला, माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकर्‍यांच्या आणि सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर कर’, असे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.