साडेसात कोटी रुपयांची हानीभरपाई मिळण्यासाठी महापालिका दावा करणार !

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहातील आगीच्या घटनेच्या चौकशीसाठी समितीची स्थापना !

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑगस्ट क्रांती मैदानामध्ये ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाचा शुभारंभ !

‘‘स्वातंत्र्य सैनिकांचा त्याग आणि बलीदान याची जाणीव ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानातून होईल. या अभियानामुळे राष्ट्रप्रेमाची नवी उभारी येईल.

दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजना आणि समग्र शिक्षण अभियान यांतील  शिक्षकांना सेवेत घेणार ! – मुख्यमंत्री

समग्र शिक्षा अभियान आणि दिव्यांग एकात्मिक शिक्षण योजना यांतील वर्ष २००६ पासून सेवेत असणार्‍या ३ सहस्र १०५ शिक्षकांना सरकार शासकीय सेवेत घेणार आहे, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

बांगलादेशातील अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी समन्वय समितीची स्थापना !

बांगलादेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना भारतात सुरक्षितपणे आणण्यासाठी केंद्रशासनाकडून प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने समन्वय समितीची स्थापना केली आहे.

पिंपरी-चिंचवडच्या पूरग्रस्तांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करू ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुळा आणि पवना या नद्यांना पूर आल्यानंतर नदीकाठच्या रहिवाशांना प्रतिवर्षी स्थलांतरित व्हावे लागते. या संकटातून बाहेर काढण्यासाठी सुरक्षित जागेत कायमस्वरूपी पुनर्वसन करण्याचा पर्याय काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्तांना दिले.

‘मुख्‍यमंत्री – माझी लाडकी बहीण योजने’च्‍या स्‍थगितीची याचिका न्‍यायालयाने फेटाळली !

मुख्‍यमंत्री – माझी लाडकी बहीण योजना हा सरकारचा धोरणात्‍मक निर्णय आहे. त्‍यामुळे या योजनेला स्‍थगिती देता येणार नाही, असे नमूद करत मुंबई उच्‍च न्‍यायालयाने या योजनेच्‍या स्‍थगितीची याचिका फेटाळून लावली !

छत्रपती संभाजीनगर येथे मराठा आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २ ऑगस्ट या दिवशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते. त्या निमित्ताने पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

SANATAN PRABHAT EXCLUSIVE : अर्धा पावसाळा संपला, तरी भूस्‍खलनप्रवण ४०० ठिकाणांच्‍या नागरिकांच्‍या स्‍थलांतराचा आढावाच घेतला नाही !

महाराष्‍ट्राच्‍या आपत्ती व्‍यवस्‍थापन विभागाचा अनागोंदी आणि जनताद्रोही कारभार ! दैनिक ‘सनातन प्रभात’च्‍या प्रतिनिधीला ‘कार्यवाहीविषयी जिल्‍हा प्रशासनाकडून माहिती मागवावी लागेल’, असे उत्तर मिळाले !

ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘कल्याणकारी महामंडळ’ स्थापन करू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे, हे शासनाचे कर्तव्य आहे. ‘ज्येष्ठ नागरिक कल्याणकारी महामंडळा’ची स्थापन करण्याची घोषणा करण्यात येईल.

पाऊस ओसरल्याने पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत संथगतीने उतार !

कोल्हापूर शहरात अनेक उपनगरांमध्ये पाणी असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मांगूर फाट्याजवळ पाणी आल्याने एकेरी वाहतूक चालू होती.