नेदरलँड्स सरकार पुढील वर्षीपासून शाळांमध्ये भ्रमणभाष वापरण्यावर बंदी घालणार !

सरकारचे म्हणणे आहे की, यंत्रांचा शिक्षणावर परिणाम होत आहे. विद्यार्थी शिक्षणावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.

नंदुरबार येथे वादळाने जिल्हा परिषदेच्या ४४ शाळांची हानी !

विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी करणार्‍या संबंधितांवर कारवाई करायला हवी !

मसगा महाविद्यालयात इस्लामचा प्रचार केल्याप्रकरणी प्रा. अनिस कुट्टींसह ३ आरोपी !

अनुमती न घेता हा कार्यक्रम आयोजित केल्याप्रकरणी मसगा महाविद्यालयाने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष निकम यांना निलंबित केले होते. या प्रकरणी कॅम्प पोलिसांनी १५ जणांवर जातीय तेढ निर्माण करून धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंद केला आहे.

गुजरातमध्ये शाळेत बकरी ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात हिंदु विद्यार्थ्यांनी केले नमाजपठण !

शिक्षणाधिकार्‍यांकडून चौकशीचा आदेश
मुख्याध्यापिकेकडून क्षमायाचना !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्‍या दीक्षांत समारंभात गदारोळ !

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठामध्‍ये २७ जून या दिवशी आयोजित केलेल्‍या ६३ व्‍या दीक्षांत समारंभात मंचावर बोलावून पदवी प्रमाणपत्र दिले नसल्‍याचे कारण पुढे करत पी.एच्.डी. संशोधक विद्यार्थ्‍यांनी गदारोळ घातला.

गोव्यात निम्म्या सरकारी प्राथमिक शाळांमध्ये १० किंवा त्याहून अल्प विद्यार्थी

या शाळांमध्ये तातडीने विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न न झाल्यास पटसंख्येच्या अभावी शाळा बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. गोवा सरकार मात्र सरकारी प्राथमिक शाळांच्या साधनसुविधांमध्ये वाढ केल्याचा दावा करत आहे.

राजे शिवाजी उत्‍सव मंडळाच्‍या वतीने विनामूल्‍य शैक्षणिक साहित्‍याचे वाटप !

ए.पी.एम्.सी. फळ मार्केट येथील राजे शिवाजी उत्‍सव मंडळाच्‍या वतीने प्रतीवर्षीप्रमाणे याही वर्षी शालेय विद्यार्थ्‍यांना विनामूल्‍य शैक्षणिक साहित्‍याचे वाटप करण्‍यात आले. या वेळी शिवसेनेचे फळ मार्केटचे उपविभाग प्रमुख तथा मंडळाचे संस्‍थापक अध्‍यक्ष गणेश म्‍हांगरे, बाबासाहेब नवले, संकेत तांबोळी आदी पदाधिकारी उपस्‍थित होते.

भविष्‍यात प्रत्‍येक शाळेत ‘सीसीटीव्‍ही’ बसवण्‍यात येणार ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

विद्यार्थ्‍यांना जे शिकवण्‍यात येते ते त्‍यांना ग्रहण होते का, तसेच अन्‍य गोष्‍टींवर लक्ष ठेवण्‍यासाठी भविष्‍यात प्रत्‍येक शाळेत आणि परिसरात ‘सीसीटीव्‍ही’ बसवण्‍यात येतील

सिंधुदुर्ग : शिक्षकांच्या रिक्त पदांवर निवृत्त शिक्षक किंवा डी.एड्. उमेदवार यांना सामावून घेणार !

यामध्ये गुणवत्ता सूचित आलेल्यांनाच संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी २० सहस्र रुपये मानधन ठरवण्यात आले आहे; मात्र यात निवड झालेले उमेदवार भविष्यात ‘सेवेत कायम करा’, असा दावा करू शकत नाहीत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवणार !

उत्तरप्रदेश शिक्षण मंडळाने राज्याच्या अभ्यासक्रमात पालट केला आहे. आता पाठ्यपुस्काद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह ५० महापुरुषांची जीवनगाथा शिकवण्यात येणार आहे.