पुणे विद्यापिठाचा निकाल ५ मास रखडल्याचे प्रकरण
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागातील अधिकार्यांच्या दायित्वशून्यतेमुळे ५ मासांनंतरही विद्यार्थ्यांचा निकाल रखडला आहे. अधिसभेच्या बैठकीच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना निकाल मिळाला; मात्र या विद्यार्थ्यांचे वाया गेलेले शैक्षणिक वर्ष परत मिळणार का ? या प्रश्नाचे उत्तर अधिसभाही देऊ शकली नाही. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संदर्भात सभासदस्य गणपत नांगरे यांनी स्थगन प्रस्ताव सादर केला होता. नांगरे यांनी विद्यापिठाला पत्र देऊनही त्याची नोंद घेतली नसल्याचे सांगितले. निकालाला विलंब झाला असला, तरी समिती गठीत करून ८ दिवसांत या संदर्भात निर्णय घेण्याचे कुलगुरु डॉक्टर सुरेश गोसावी यांनी मान्य केले.