जिल्‍हा परिषदेच्‍या अखत्‍यारीतील ८० शाळा शिक्षकांविना !

जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांची स्‍थिती अशी का ? शाळेमध्‍ये शिक्षकच नाहीत, ही स्‍थिती गंभीर आहे. अशा स्‍थितीमुळेच जिल्‍हा परिषदेच्‍या शाळा बंद पडत आहेत, हे लक्षात घेऊन त्‍यावर त्‍वरित उपाययोजना काढणे आवश्‍यक !

गोवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळा !

इयत्ता ७ वीच्या पाठ्यपुस्तकातील विकृत इतिहास त्वरित वगळावा, ‘लँड जिहाद’ करणारा ‘वक्फ कायदा’ रहित करावा, या मागण्या म्हापसा येथे संपन्न झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाच्या माध्यमातून विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केल्या.

कोकणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख !

कणी उजळणी पुस्तकात ‘औ’ अक्षराची ओळख करून देतांना ‘औरंगजेब’ असा उल्लेख आणि औरंगजेबाचे रेखाचित्र छापण्यात आले आहे. यामुळे राज्यात नवीन वाद निर्माण झाला आहे.

सिंधुदुर्ग : प्राथमिक शाळांमध्ये सेवानिवृत्त शिक्षक नेमण्यास वाढता विरोध

राज्यात अनेक डी.एड्. आणि बी.एड्. पदवीधारक बेरोजगार असतांना प्राथमिक शाळांमधून सेवानिवृत्त शिक्षकांना नेमण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने, तसेच नवीन शिक्षक भरती होईपर्यंत या बेरोजगार युवकांना संधी मिळावी.

रत्नागिरी जिल्ह्यात तात्पुरती नियुक्ती केलेल्या शिक्षकांना कामावरून केले कमी

शाळांमध्ये शिक्षक नसल्याने ग्रामस्थांसह पालक आक्रमक झाले होते. अनेक ठिकाणी तर ‘आम्ही शाळा बंद करू’, अशी चेतावणी देण्यात आली होती.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्‍ये पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमांना प्रवेश अर्ज अल्‍प !

पदव्‍युत्तर अभ्‍यासक्रमांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठामध्‍ये प्रवेश अर्ज अल्‍प का आले आहेत ? हे विद्यापीठ प्रशासनाने शोधणे आवश्‍यक !

परभणी येथे आर्थिक व्‍यवहारांद्वारे वैयक्‍तिक मान्‍यतेत अपहार करणारे २ शिक्षणाधिकारी निलंबित !

निलंबित करणे, ६ मास चौकशी करून पुन्‍हा अशा अधिकार्‍यांचे स्‍थानांतर करणे, यांमुळे भ्रष्‍ट अधिकार्‍यांच्‍या मनोवृत्तीत कसा फरक पडणार ? अशांना बडतर्फ करून त्‍यांच्‍यावर फौजदारी कारवाई करायला हवी.

शाळेत टिकली लावून गेल्याने शिक्षिकेकडून मारहाण आणि आईला अपमानित केल्याने हिंदु विद्यार्थिनीची आत्महत्या !

हिंदू त्यांच्या मुलांना अशा मानसिकतेच्या शाळेत शिकण्यास पाठवून स्वतःची संस्कृती आणि धर्माचरण यांपासून दूर जात आहेत अन् हेच त्यांच्या अधोगतीचे एक कारण ठरत आहे. हे हिंदूंना लक्षात येत नसल्याने ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

शाळा दुरुस्तीच्या कामांत वेळकाढूपणा करणार्‍यांची चौकशी करून कारवाई करा ! – रवींद्र चव्हाण, पालकमंत्री, सिंधुदुर्ग

प्राथमिक शाळांच्या दुरुस्तीची १२६ कामे एकत्रितपणे का चालू केली नाहीत ?  शासकीय निधी आणि वेळ यांचा योग्य उपयोग व्हायला हवा. दुरुस्तीसाठी विलंब का लागला ? – रवींद्र चव्हाण, पालकमंत्री

सिंधुदुर्ग : सेवानिवृत्त शिक्षकांची कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरती करणार !

निवृत्त शिक्षकांना निवृत्तीवेतन असतांना २० सहस्र रुपये मानधन देऊन नेमण्यामागील उद्देश काय ? डी.एड्. झालेले बेरोजगार असतांना हा निर्णय का घेतला ?