राष्ट्रघातकी काँग्रेस !

भारत जिहादी आतंकवादाच्या विरोधात लक्ष्यभेद करण्याचे धाडस दाखवत नाही, हेच सत्य आहे. अर्जुनाला माशाचा डोळाच दिसत होता, आताच्या लोकांना केवळ मासाच दिसतो आणि त्यांचे बाण अन्यत्रच लागत आहेत. त्यामुळे जे साध्य करायचे आहे, ते होत नाही. ही स्थिती पालटली पाहिजे.

खायचे आणि दाखवायचे दात !

काश्मीरच्या प्रश्‍नावर अथवा अन्य सूत्रांवर मध्यस्थी करू, असेही अमेरिका सांगते आणि दुसर्‍या बाजूला भारताने अफगाणिस्तानातील आतंकवाद मोडून काढावा, असेही सांगते. पाकप्रेमी बायडेन सत्तेवर आल्यामुळे भारताने अमेरिकेविषयी अधिकच सतर्क रहाण्याचा धोरण स्वीकारणे आवश्यक बनले आहे, हे मात्र खरे !

काँग्रेसचे आतंकी !

काँग्रेसने ती स्वत: कितीही म्हटले की, आम्ही बापूंच्या अहिंसेच्या मार्गावर चालतो, तर त्यावर आता कुणीही विश्‍वास ठेवणार नाही. खरे तर संपत राज यांना जनतेने निवडून देणे, हेही चुकीचेच आहे. आतातरी जनतेने शहाणे होऊन अशा लोकप्रतिनिधींना निवडून न देता त्यांना घरी बसवायला हवे.

एकजुटीने देशस्वार्थ साधा रे !

भारतियांनी निदान शत्रूराष्ट्राचा पराभव करण्यासाठी तरी एकजुटीने त्यांच्या उत्पादनांवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याची कडक प्रतिज्ञा करत तिचे आचरण केले पाहिजे. असे करणे, हे सैन्य आणि शासन यांना मोठे साहाय्य असेल.

आयुर्वेद आणि भारताचे दायित्व

ऋषिमुनींनी आपल्याला दिलेली ही आयुर्वेदाची अनमोल अशी देणगी टिकवून ठेवायला हवी. जागतिक आरोग्य संघटनेच्या घोषणेनंतर भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आता या आयुर्वेदशास्त्राला सार्वभौमत्वाच्या सिंहासनावर पुनर्स्थापित करणे, हे प्रत्येकाचे दायित्व आहे. ते पार पाडण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत !

एमआयएमचे घातक मनसुबे !

एका फाळणीचे दुष्परिणाम भारत भोगत आहे. त्यातच जीना यांच्या पावलावर पाऊल टाकणार्‍या ओवैसी बंधू यांनी सूचित केलेल्या दुसर्‍या फाळणीसाठी भारत सिद्ध आहे का ? तसे होऊ नये, यासाठी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी वेळीच जागे होऊन भविष्यातील संकटाचा सामना करण्यास सिद्ध व्हायला हवे !

नक्षलवादाचे पाठीराखे !

केंद्रातील सरकारने शाळा-महाविद्यालये यांमध्ये क्रमिक अभ्यासक्रम पालटण्याची, तसेच शिक्षणाच्या टप्प्यांच्या रचनेत पालटण्याचे प्रयत्न गतीमानतेने करावेतच. नक्षलवादाच्या समर्थकांना शोधून कठोर शिक्षा करण्याची चळवळच हाती घ्यावी, जेणेकरून असे प्रयत्न भविष्यात कुणी करण्यास धजावणार नाही.

गो उपचार !

नेदरलँडमध्ये (हॉलंडमध्ये) गो उपचार ही नवीन पद्धत रूढ होत आहे. यानुसार गायीला मिठी मारणे, तिला स्पर्श करणे, तिला कुरवाळणे असे प्रकार केले जातात. गायींच्या सहवासात घालवलेला थोडासा वेळ हा संबंधितांना लाभदायक ठरत आहे.

बॉलिवूडवाल्यांचे पाप !

सध्या बॉलिवूडमधील घराणेशाहीचे सूत्र उपस्थित झाले असून काही नामांकित घराण्यांवर टीकेची झोड उठली आहे. आता त्याही पुढे जाऊन बॉलिवूडमधील कलाकारांचे पाकची कुख्यात गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.शी संबंध असल्याचे आरोप होत आहेत.

भक्तीतील शक्ती !

कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील कोरोना कक्षातील रुग्णांकडून भजन आणि कीर्तन यांद्वारे सत्संग चालू असतो. या सत्संगामुळे रुग्णांचे मनोबल वाढले असून वातावरण सकारात्मक झाल्याचे आधुनिक वैद्यांनी सांगितले.