शांततेची परिभाषा काय ?

‘ग्लोबल पीस इंडेक्स २०२२’चा अहवाल घोषित झाला आहे. या अहवालानुसार भारतात मागील १ वर्षात शांततेत वाढ झाली असून लोकांमध्ये परस्पर स्नेह वाढला आहे. गतवर्षी भारताचा क्रमांक शांततेच्या सूचीत १३८ वा होता, तो आता ३ क्रमांकांनी वर येऊन १३५ झाला आहे; म्हणजे सुधारणा होऊन भारताची स्थिती चांगली झाली आहे. या अहवालानुसार आईसलँड जगातील सर्वांत शांत देश म्हणून प्रथम क्रमांक, तर अफगाणिस्तान सर्वांत अशांत देश म्हणून त्याला १६३ वा हा शेवटचा क्रमांक दिला आहे. भारताच्या शेजारील नेपाळ ७३ वा, तर श्रीलंकेला ९० वा क्रमांक, बांगलादेशाला ९६ वा क्रमांक दिला आहे. पहिल्या १० मध्ये युरोपातील ४ देशांना सहभागी करून घेतले आहे. हा ‘इंडेक्स’ घरगुती आणि आंतरराष्ट्रीय संघर्ष, सामाजिक सुरक्षा यांसमवेत अन्य दोन डझन मापदंडांच्या आधारे मूल्यांकन करून त्यानंतर जारी केला आहे.

ही शांतता आहे का ?

आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेचे मापदंड मोजणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे मापदंड घोषित असले, तरी ‘त्यानुसार मोजमाप या संस्था कशा करतात ?’, हा प्रश्नच आहे. ‘भारतात शांतता वाढली’, असे त्यांना वाटत असले, तरी ती चांगलीच गोष्ट आहे. प्रत्येक भारतियाला ‘भारतात सदासर्वकाळ शांततापूर्ण वातावरण असावे’, असेच वाटते. प्रत्यक्षात जी ३ अंकांनी वाढ झालेली आहे, ती समाधानकारक आहे का ? सर्वसामान्य भारतियाला जर कुणी ‘भारतात शांतता आहे का ?’, असे विचारल्यास तो गोंधळात पडल्याविना रहाणार नाही. भारतात हिंदूंची लोकसंख्या बहुसंख्य आहे, हिंदू हे शांतताप्रिय आहेत; म्हणून भारत हा शांतता क्षेत्रात मोडू शकतो. भारतात हिंदूंची संख्या बहुसंख्य असली, तरी येथील शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणाकडून होतो ? हे हिंदूंसह सर्वांनाच ठाऊक आहे. हिंदूंच्या शांततेत चालणाऱ्या मिरवणुकांवर दगडफेक, शांततेत चालणाऱ्या सण-उत्सवांच्या ठिकाणी दगडफेक करणे, तेथे जाळपोळ करणे, मंदिरांच्या समोर गोमांस फेकणे, हिंदूंच्या मुलींना लव्ह जिहादमध्ये अडकवून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणे, हिंदूंवर दादागिरी करून, मुलींची छेड काढून, छळवणूक करून त्यांना विशिष्ट प्रदेशातून पलायन करून जाण्यास भाग पाडणे, हे कोण करते ? नुकताच एका पंथाच्या श्रद्धास्थानाच्या तथाकथित अवमानाचा निषेध करण्याच्या नावाखाली देशातील विविध राज्यांमध्ये हिंसाचार उसळून आला. यामुळे देशातील वातावरण ढवळून निघाले. तसाच हिंसाचार सीएए, एन्.आर्.सी. या कायद्यांच्या वेळीही अनुभवण्यास मिळाला. ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडण्याच्या घटनेच्या वेळी देशभर तणावाची परिस्थिती, तर राममंदिराच्या जागेचा निकाल लागण्याच्या वेळीही देशभर सैन्य तैनात करण्याची वेळ आली होती. शांतता कोण बिघडवते ? हे शासनकर्त्यांसह सर्वांनाच ठाऊक आहे. तरी कारवाई दोन्ही बाजूंवर होते.

अशांततेचे मूळ !

काश्मीरमध्ये पूर्वीच्या म्हणजे ३७० कलम हटवण्यापूर्वीच्या तुलनेत आता शांतता निर्माण झाली, असे म्हणावे, तर प्रतिदिन हिंदूंची हत्याकांडे चालू आहेत. अगदी २-३ दिवसांमध्येच देशातील युवकांना केंद्राच्या ‘अग्नीवीर’ बनण्याच्या नव्या योजनेला विरोध करण्यासाठी काही राज्यांतील युवक (कि विध्वंसक) अतिशय हिंसक झाले आणि त्यांनी रेल्वे जाळल्या. अशी स्थिती हे शांतता वाढल्याचे द्योतक आहे कि अल्प झाल्याचे ? भारतात कौटुंबिक हिंसाचारात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. कौटुंबिक न्यायालयात महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात प्रतिवर्षी १ सहस्र ८०० हून अधिक प्रकरणे प्रविष्ट होत आहेत, अशी आकडेवारी आहे. काहीतरी मोठे घडण्यापूर्वी असणारी स्मशान शांतताही भारत अधूनमधून अनुभवत असतो. बहुसंख्य हिंदूंना दंगलीच्या वेळी याचा प्रत्यय येतो. शांतताप्रिय हिंदूंनाच देशातील अनेक भागांत असुरक्षित वाटू लागले आहे. शुक्रवारच्या एका समुदायाच्या प्रार्थनेनंतर काय होईल ? याचा ताण प्रत्येक आठवड्याला हल्ली हिंदूंना असतो. या समस्या भारतात अशांततेचे मूळ नेमके कुठे आहे ? त्यावर प्रकाश टाकतात. अशांततेचे मूळ दूर केल्यावर शांतता निर्माण होणारच आहे. प्रजा राजाला अर्थात् शासनकर्त्यांना कर देते, ते केवळ सुविधा, सवलती पुरवण्यासाठी नव्हे, तर प्रजेच्या संरक्षणाचे दायित्वही प्रशासनावर असते. जनतेच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि त्यासाठी प्रत्यक्ष प्रयत्न यांवर राष्ट्राची शांतता अवलंबून असते. तसेच कौटुंबिक, सामाजिक आणि सांस्कृतिक वाद टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना अन् प्रत्यक्ष कृती यांवरही अंतर्गत शांतता अवलंबून असते. बाह्य असो अथवा अंतर्गत असो शांततेची अनुभूती केवळ सैन्यबळ, विविध सुरक्षायंत्रणा यांच्या पहाऱ्याद्वारे मिळू शकणार नाही. जनतेचे मनोबल, आत्मबल उंचावणारी साधना जनतेला शिकवल्यास आणि ती जनतेने आत्मसात करून कृती केल्यास शांतता अनुभवत जनता दैनंदिन कृती करू शकते.

पाश्चात्त्यांची शांततेची कल्पना ही भौतिकतावादावर अवलंबून आहे. बाह्य गोष्टी, सुखे आणि समस्या यांची व्याप्ती यांचा विचार केल्यास तेथे सुखवस्तू कुटुंबे आहेत. तरी मानवी जीवन शांत आहे का ? समाधानी आहे का ? महागाईने होरपळून निघणारी श्रीलंका अथवा हिंदूंवर प्रतिदिन आक्रमणे करून त्यांना निर्वंश करू पहाणारा बांगलादेश या संस्थांना कसा काय शांत वाटतो ? हे मोठे कोडे आहे. यावरून आंतरराष्ट्रीय संस्थांची शांततेची परिभाषा काय ? हेसुद्धा अनाकलनीय आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय चौरस कुटुंबाचा विचार केला, तर काय आढळते ? भारतात केवळ एक वेळचे जेवण मिळून, अनंत अडचणी, समस्या यांच्याशी झुंज देत समाधान मानणारी आणि शांततेत जीवन व्यतीत करणारी लाखो कुटुंबे आहेत. राष्ट्रीय स्तरावर विचार केल्यास जिहादी, मिशनरी आणि साम्यवादी, तसेच हिंदुविरोधी यांची अभद्र युती भारताची शांतता भंग करत आहेत. ही शांतता पुनर्प्रस्थापित करण्यासाठी हिंदु राष्ट्र हेच उत्तर आहे.

बाह्य शांतता कितीही राखली, तरी मनाच्या शांततेसाठी साधनेची कासच हवी !