अमरनाथ यात्रेत बाँबची धमकी देणार्‍या तरुणाला मुंबईत अटक !

मुंबई – अमरनाथ यात्राकाळात बाँबची धमकी देणारा संदेश काश्मीर पोलीस नियंत्रण कक्षाला पाठवल्याप्रकरणी शुभम यादव (वय २६ वर्षे) याला अटक करण्यात आली आहे. शुभम हा ऑनलाईन साहित्य पोचवण्याचे काम करतो. धमकीचा संदेश पाठवण्यासाठी वापरलेला त्याचा भ्रमणभाषही जप्त करण्यात आला आहे.  त्याने पाठवलेल्या संदेशात ‘अमरनाथ यात्राकाळात बाँब ठेवला जाईल’, अशी धमकी देण्यात आली होती. आरोपीने खोडसाळपणा केल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

कायदा-सुव्यवस्थेची ऐशीतैशी झाल्यानेच अशी धमकी देण्याचे धाडस वाढते ! अशांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !