
नवी मुंबई – मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस झाल्यानंतर आता ऐरोली बसस्थानकात खड्डे पडले आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचे वाशी बसस्थानक हे सर्वाधिक गर्दीचे ठिकाण आहे. पावसाळ्यापूर्वी काही बसस्थानकांमधील रस्ते खड्डेमुक्त करण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला होता; मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात संततधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सीबीडी, नेरूळ, वाशी, तुर्भे येथील काही रस्ते, तसेच ऐरोली बसस्थानक येथे खड्डे पडले आहेत.
या बसस्थानकात बस वळवण्याच्या ठिकाणी, तसेच बाहेर पडण्याच्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे पादचार्यांना त्रास होत आहे. बस खड्ड्यांत आदळली की प्रवाशांच्या मणक्याला मार बसत आहे. बस जवळून जाणार्या पादचार्यांच्या अंगावर घाण पाणी उडते. खड्ड्यांच्या दुरुस्तीसाठी महापालिकेकडून अद्याप कोणतीही कार्यवाही चालू नाही. खडी आणि रेती यांनी तात्पुरते खड्डे भरून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
टाकळी (सांगली) येथे वाढीव वर्गणी देऊनही भेडसावणार्या तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिक त्रस्त !
कुडाळ येथील शासकीय भूमीतील अनधिकृत ‘फास्ट फूड स्टॉल’ अखेर हटवला
पुणे शहरातील रस्त्यांवर केवळ ५४ खड्डेच !