समुद्रकिनारपट्टीतील अमली पदार्थ व्यवहार आणि ‘रेव्ह’ पार्ट्या रोखणे यांत मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे ! – विनोद पालयेकर, आमदार, गोवा फॉरवर्ड

‘एन्.सी.बी.’ने गोव्यात ठिकठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचे अमली पदार्थ कह्यात घेतले होते.

भदोही (उत्तरप्रदेश) येथे ‘शंकर पार्वती बीडी’ या नावाने उत्पादनाची विक्री !

उत्तरप्रदेशमध्ये हिंदूंच्या देवतांचा अशा प्रकारे अवमान होत असतांना त्याविरोधात तक्रार होऊनही निष्क्रीय रहाणार्‍या पोलिसांवर सरकारने कारवाई केली पाहिजे !

 ‘नेटफ्लिक्स’ला ‘बॉम्बे बेगम्स’ वेब सिरीजचे प्रसारण थांबवण्याची राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाची नोटीस

केंद्र सरकारने वेब सिरीजसाठी बनवलेल्या नियमावलीमुळे वेब सिरीज बनवणार्‍यांवर कोणताही वचक बसलेला नाही, हेच यातून लक्षात येते ! त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने म्हटल्यानुसार असे चित्रण रोखण्यासाठी कायदाच हवा !

कळंगुट येथे २ निरनिराळ्या छाप्यांमध्ये एकूण १ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

कळंगुट पोलिसांनी ९ मार्च या दिवशी २ निरनिराळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण १ लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत.

गोव्यातील अमली पदार्थ पुरवठ्याची साखळी मोडून काढू ! – समीर वानखेडे, विभागीय संचालक, ‘एन्.सी.बी.’

गोव्यातील अमली पदार्थ पुरवठ्याची साखळी मोडून काढण्यात येणार आहे, अशी माहिती ‘एन्.सी.बी.’चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलतांना दिली.

अमली पदार्थ नियंत्रण विभागाने गोव्यात ठिकठिकाणी घातलेल्या छापासत्रात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ कह्यात

यासाठी केवळ छापासत्रांवर समाधान न मानता अमली पदार्थांविषयीचे कायदे कठोर आणि सक्षम करणे आवश्यक आहे !

हणजूण येथे नायजेरियन नागरिकाचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू

हणजूण येथे नायजेरियन नागरिक मायकल झुबे (वय ३३ वर्षे) याचा अमली पदार्थाच्या अतीसेवनाने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

पोलीस ठाण्याच्या हद्दीत हुक्का पार्लर आणि डान्स बार आढळल्यास पोलीस अधिकार्‍यांना उत्तरदायी धरणार ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

हुक्का पार्लर प्रकरणी शिवसेनेने तारांकित प्रश्‍नोत्तराच्या वेळी ‘या प्रकरणी किती ठिकाणी कारवाई करण्यात आली ?’ असा प्रश्‍न उपस्थित केला होता.

गुटख्याची पाळेमुळे शोधण्यासाठी संभाजीनगर येथील पोलीस सातारा शहरात तळ ठोकून !

सातारा – संभाजीनगर येथील पोलिसांनी काही दिवसांपूर्वी हिरा गुटख्याची वाहतूक करणार्‍या ३ गाड्यांसह ३ आरोपींना कह्यात घेतले होते. या वेळी त्यांच्याकडून गुटख्याची २३ पोती आणि ३ वाहने असा ७ लाखांहून अधिक मुद्देमाल शासनाधीन केला.

भाजपच्या नेत्यासह त्याच्या दोन्ही मुलांना अटक

भाजपचे नेते गुन्हेगारीत सहभागी असणे हिंदूंना अपेक्षित नाही !