पुणे येथील भूमी खरेदी-विक्री करणार्‍या दलालाकडून २० लाख रुपयांची खंडणी उकळणार्‍या दोघांना अटक !

जीवे मारण्यासाठी ५० लाख रुपयांची सुपारी घेतल्याची धमकी देऊन जमीन खरेदी-विक्री करणार्‍या दलालाकडून २० लाख रुपयांची खंडणी उकळणार्‍या सागर दत्तात्रय फडतरे आणि गणेश दत्तात्रय फडतरे या दोघांना अमली पदार्थ अन् खंडणीविरोधी पथकाने..

बंगालमधील भाजप युवा मोर्चाच्या महिला नेत्याला ५ लाख रुपयांच्या कोकीनसहीत अटक

ज्या आरोपाखाली भाजपच्या नेत्याला अटक झाली आहे, ते आरोप गंभीर आहेत.

वाई (जिल्हा सातारा) येथून २९ किलो गांजा शासनाधीन

वाई (जिल्हा सातारा) येथील नंदनवन वसाहतीमधील एका बंगल्यामध्ये गांजाची शेती केली जात होती. पोलिसांंनी या बंगल्यावर धाड टाकली. त्यांना तिथे २९ किलो गांजा आणि २ जर्मन नागरिक आढळून आले.

नक्षलग्रस्त भागातून पुरवठा होत असलेला साडेतीन कोटी रुपयांचा गांजा विक्रोळी (मुंबई) येथे जप्त, २ जणांना अटक

गांजाची शेती करून नक्षलवाद्यांची राष्ट्रविरोधी मोहीम : विविध माध्यमांतून राष्ट्रविरोधी कारवाया करणारे नक्षलवादी आणि त्यांना सहकार्य करणारे राष्ट्रद्रोही यांचा कसून शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी !

हिमाचल प्रदेशातून पुणे येथे अमली पदार्थ घेऊन येणार्‍या वाहन चालकावर कारवाई !

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील खडकी येथे सापळा रचून वाहन चालक वीरेंद्र शर्मा याला पोलिसांनी कह्यात घेतले.

मुंबई येथे २ अमली पदार्थ तस्करांना एन्.सी.बी.कडून अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एन्.सी.बी) येथील जोगेश्‍वरी परिसरातून इब्राहिम मुजावर उपाख्य इब्राहिम कासकर आणि आसिफ राजकोटवाला या २ अमली पदार्थ तस्करांना ७ फेब्रुवारी या दिवशी अटक केली आहे. एन्.सी.बी.ने या आरोपींकडून चारचाकीही हस्तगत केली आहे.

मुंबईतील झोपडपट्ट्यांतील धर्मांध महिलांचा अमली पदार्थांच्या अवैध धंद्यात मोठा सहभाग

जे सामान्यांना ठाऊक असते, ते पोलीस आणि शासन यांना ठाऊक नसते असे नव्हे. अवैध धंदे चालणार्‍या सर्वच ठिकाणांवर धाडी टाकून ते धंदे पूर्णतः संपवण्याची इच्छाशक्ती कोणते सरकार आणि त्यांचे पोलीस राबवणार ?, हा प्रश्न आहे !

एन्.सी.बी.कडून राहिला फर्निचरवाला हिला अटक

. एन्.सी.बी.ने या प्रकरणी ४ फेब्रुवारी या दिवशी रात्री २ जणांना अटक केली आहे. यामध्ये एक ब्रिटीश नागरिक करण सजनानी आहे, तर दुसरी राहिला फर्निचरवाला आहे. राहिला ही अभिनेत्री दिया मिर्झा हिची साहाय्यक (असिस्टंट) होती. एन्.सी.बी.ने गेल्या मासात विविध लोकांकडून २०० किलोग्रॅम अमली पदार्थ जप्त केले होते.

एम्.डी. तस्करीप्रकरणी माफिया पठाणला अटक

एम्.डी. (नशायुक्त पदार्थ) तस्करी प्रकरणात राज्य आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) दक्षिण मुंबईत पाब्लो एस्कोबार (कोलंबियातील ड्रग माफिया) या नावाने ओळख असलेल्या परवेज नसरुल्ला खान उपाख्य चिंकू पठाण (वय ४० वर्षे) याला अटक केली आहे.

भोजनातून गुंगीचे औषध देऊन ९ कलाकारांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांची चोरी

हे सर्व कलाकार लातूर जिल्ह्यातील राचनवाडी येथील असून हे सर्वजण देवीच्या गाण्याच्या कार्यक्रमासाठी आले होते. ‘सीसीटीव्ही’च्या साहाय्याने पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.