कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील गतवर्षीच्या दळणवळण बंदीचा गोव्यातील अमली पदार्थ व्यवसायावर पुष्कळ अल्प परिणाम !

अमली पदार्थ व्यवसाय करणार्‍यांवर या महामारीच्या वर्षांत पोलीस, गोवा पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग आणि अमली पदार्थविरोधी पथके यांनी मिळून जवळजवळ ९०० धाडी घातल्या.

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांच्या पलायनामध्ये कारागृहातील कर्मचार्‍यांचा हात असल्याचा अन्वेषण यंत्रणेला संशय

अन्वेषण यंत्रणेला कारागृहातील कर्मचार्‍यांच्या विरोधात मोठी माहिती मिळाली आहे.

नंदुरबारमध्ये अफू लागवड : कायदा-सुव्यवस्थेचे तीनतेरा ?

नंदुरबार जिल्ह्यात थेट अफूची शेती करण्याचे धाडस करणारे सूत्रधार कोण ? हा प्रश्‍न महत्वाचा आहे. सध्याच्या विविध प्रकारच्या तस्करींवर एकही लोकप्रतिनिधी ‘ब्र’ काढत नाही, हे वास्तव आहे.

श्रीलंकेच्या नौकेमधून ३०० किलो हेरॉईन, ५ एके-४७ रायफली जप्त

हे साहित्य इराणमधील चाबाहार बंदरावरून आले होते. हे साहित्य लक्षद्वीप येथे श्रीलंकेच्या नौकेवर ठेवण्यात आले, जे नंतर श्रीलंकेला नेण्यात येणार होते.

दाऊदचा मुंबईतील अमली पदार्थांचा हस्तक दानीश चिकणा याला अटक

अमली पदार्थविरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत दानीश याच्याकडे अमली पदार्थ सापडले आहेत.

वर्ष २०१७ पासून राज्यात अमली पदार्थांवरील कारवाईची एकूण ७७५ प्रकरणे नोंद

केवळ गुन्हे नोंदवून अमली पदार्थ व्यवसाय बंद होणार नाही. त्यासाठी कायदेही तसेच सक्षम बनवावे लागतील

अशा प्रशासकीय अधिकार्‍यांवर कारवाई करा !

होळीमध्ये लोक मद्यपान करतात. तो अमली पदार्थांचे सेवन करण्याचाही उत्सव आहे. याची माहिती मिळाली, तर पोलिसांना द्यावी, असे आवाहन उत्तरप्रदेशातील फरुखाबादचे दंडाधिकारी अशोककुमार मौर्य यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले.

अमली पदार्थ प्रकरणी गेल्या २ मासांत १८ गुन्ह्यांची नोंद, तर १८ जणांना घेतले कह्यात

या सर्व प्रकरणी संशयितांकडून एकूण २२ लाख ७८ सहस्र रुपये किमतीचे एकूण सुमारे १६ किलो ४८० ग्रॅम अमली पदार्थ कह्यात घेण्यात आले.

केळघर (जिल्हा सातारा) येथे सीमा शुल्क विभागाची धाड

सीमा शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीद्वारे तावळी तालुक्यातील केळघर येथे एका ‘फार्म हाऊस’वर धाड टाकण्यात आली. तेथे २३ किलो ६३१ ग्रॅम इतका गांजा आढळून आला असून तो शासनाधीन करण्यात आला आहे.

गोव्यातील रेव्ह पार्ट्यांमध्ये ‘एल्एस्डी’ या महागड्या अमली पदार्थाची विक्री

गोवा आणि महाराष्ट्र यांच्यासह उत्तर भारतातील आंतरराज्य टोळी अमली पदार्थ या व्यापारामध्ये गुंतलेली असल्याची माहिती ‘एन्.सी.बी.’च्या अधिकार्‍यांनी दिली.