राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान पूर्ण : २१ जुलैला निकाल

डावीकडून यशवंत सिन्हा आणि द्रौपदी मुर्मू

नवी देहली – भारताच्या राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक १८ जुलैला पार पडली. देशातील खासदार आणि आमदार यांनी यासाठी मतदान केले.

या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आघाडीकडून द्रौपदी मुर्मू, तर काँग्रेससहित विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. २१ जुलै या दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे.