संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’असे संबोधून त्यांना अपमानित केल्याच्या मुद्यावरून शुक्रवारी भाजपने संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ घातला.

‘मी द्रौपदी मुर्मू यांना चुकून ‘राष्ट्रपत्नी’ म्हटले !’

देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीविषयी उघडपणे अशलाघ्य विधान करणारे नेते सर्वसमान्य नागरिकांशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! असे खासदार असणे जनतेला लज्जास्पद !

लोकसभेत सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी !

अधीर रंजन चौधरी यांनी केलेल्या विधानानंतर भाजपच्या खासदारांनी लोकसभेत निषेध करत घोषणा दिल्या आणि सोनिया गांधी यांच्या त्यागपत्राची मागणी केली.

मी राष्ट्रपती होणे, हे माझे वैयक्तिक यश नसून हे भारतातील प्रत्येक गरिबाचे यश आहे ! – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

द्रौपदी मुर्मू यांनी २५ जुलै या दिवशी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. संसदेतील ‘सेंट्रल हॉल’मध्ये पार पडलेल्या या शपथविधीला मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप !

देशाच्या राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड झाल्याविषयी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने शाळकरी विद्यार्थिनींना भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. या वेळी संघटन सरचिटणीस दीपक माने, ज्येष्ठ नेते प्रकाश बिरजे, शेखर इनामदार यांसह अन्य उपस्थित होते.

द्रौपदी मुर्मू भारताच्या १५ व्या राष्ट्रपती !

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार ६४ वर्षीय द्रौपदी मुर्मू देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती बनल्या आहेत.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे मतदान पूर्ण : २१ जुलैला निकाल

या निवडणुकीत सत्ताधारी भाजप आघाडीकडून द्रौपदी मुर्मू, तर काँग्रेससहित विरोधी पक्षांकडून यशवंत सिन्हा उमेदवार आहेत. २१ जुलै या दिवशी मतमोजणी करण्यात येणार आहे.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी साधला युतीच्या खासदार आणि आमदार यांच्याशी संवाद !

राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी १४ जुलै या दिवशी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना यांचे खासदार अन् आमदार यांच्याशी संवाद साधला. १८ जुलै या दिवशी होणार्‍या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुर्मू मुंबई येथे आल्या होत्या.

शिवसैनिकांच्या आग्रहाचा आदर करून राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा ! – उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना

शिवसेनेच्या खासदारांनी ११ जुलै या दिवशी ‘मातोश्री’ येथे झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याकडे राष्ट्रपतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देणार ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

जनतेचा कौल लक्षात घेता राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली.