शिवसेनेच्या ११ खासदारांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट !

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

मुंबई – ज्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देहली येथे जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, त्याच दिवशी शिवसेनेच्या ११ खासदारांनीही शहा यांची भेट घेतल्याची वृत्ते प्रसारित झाली. शिवसेनेच्या काही खासदारांनी याविषयीची माहिती माध्यमांना दिली आहे.

(सौजन्य : ABP MAJHA)  

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठींबा दर्शवण्यासाठी हे खासदार अमित शहा यांना भेटले. श्रीमती द्रौपदी मुर्मू या १४ जुलै या दिवशी मुंबई येथे प्रचारासाठी येणार आहेत. शिवसेनेने त्यांना पाठिंबा घोषित केल्यास मुर्मू या शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.