देव तारी.. !

‘न मे भक्तः प्रणश्यति।’ असे भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे. साधना करून आपण भक्त बनलो, तरच त्याची अनुभूती आपण घेऊ शकतो. संकटामुळे निर्माण झालेली हतबलता आणि अस्वस्थता यांवर मात करण्यासाठी साधनाच करणे अपरिहार्य आहे. 

भक्तशिरोमणी संकटमोचन हनुमानाची विविध गुणवैशिष्ट्ये !

हनुमंत भगवंताचा परम भक्त होता; त्यामुळे त्याच्यामध्ये लेशमात्रही अहंकार नव्हता. हनुमंतासारख्या अहंशून्य भक्ताच्या माध्यमातून, भगवंताने श्रीरामावतारात रावण, इंद्रजीत, अहिरावण, महिरावण इत्यादी मोठ्या असुरांचे गर्वहरण केले होते.

वीर्यवान्, बुद्धीसंपन्न, महातेजस्वी आणि महाबली हनुमान !

‘वाल्मीकि रामायणातील किष्किंधा कांड, सर्ग ६६ मध्ये मारुतीच्या जन्माची वर्णन केलेली कथा पुढे दिली आहे.

तमिळ भाषेतील ‘ऑनलाईन’ सत्संगाची सेवा करतांना सनातनच्या ७० व्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी पदोपदी अनुभवलेली परात्पर गुरुदेवांची कृपा !

परात्पर गुरुदेवांच्या कृपेने ‘ऑनलाईन’ सत्संगासमवेत २ ‘ऑनलाईन’ बालसंस्कारवर्ग आणि धर्माभिमान्यांसाठी १ सत्संग चालू झाल्याने कोरोना महामारीचा हा शापही वरदान ठरला.

स्त्रियांवरील अत्याचार, तसेच समाजाची ढासळलेली नैतिकता यांची कारणे आणि उपाय !

इंग्रजांच्या आक्रमणानंतर गुरुकुलपद्धत लोप पावली, स्वातंत्र्यानंतरही हिंदूंना धर्मशिक्षण दिले गेले नाही; त्याचा परिणाम म्हणजे सध्या समाजातील नैतिकता ढासळली आहे. ही स्थिती पालटण्यासाठी धर्माचरणावरील निष्ठा आणि कृती यांची आवश्यकता आहे.

सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या सुगम प्रयत्नांनी रामराज्याची पताका फडकेल ! – रसिक पीठाधीश्‍वर महंत जन्मेजय शरण महाराज, बडास्थान (अयोध्या)

‘सनातन धर्मशिक्षण आणि हिंदु राष्ट्र जागृती केंद्रा’चा लाभ करून घेतल्यास लोकांचे कल्याण होईल ! – नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला

हिंदूंवरील अन्यायाच्या विरुद्ध जागृती करून संघटन निर्माण करण्याची आवश्यकता ! – स्वामी योगेंद्रानंद शास्त्री

साधूसंतांवर अन्याय होत आहे. देशात ठिकठिकाणी हिंदूंची पिळवणूक होत आहे. हे सर्व रोखण्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करून संघटितपणा वाढवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन स्वामी योगेंद्रानंद शास्त्री यांनी केले.

नागपूर येथे श्रद्धानंद अनाथालयातील विद्यार्थिनींनी ‘पोर्टेबल गुढी’ बनवली !

धार्मिक सण, परंपरा, रूढी यांचे विज्ञानीकरण करून नव्हे, तर धर्मशास्त्रानुसार आचरण केले, तर त्याचा आध्यात्मिक लाभ होतो, हे लक्षात घ्या ! 

गुढीपाडव्याच्या दिवशी करावयाचे पंचांग पूजन आणि श्रवण

गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे आणि पंचांगात दिलेले वर्षफल वाचावे. जुन्या काळात हे वर्षफल प्रत्येक घरी जाऊन ज्योतिषी वाचत असत. तो गुढीपाडव्याचा एक विधीच होता.

चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेस वर्षारंभ करण्याची कारणे

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला प्रारंभ झाला, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.