
बृहस्पति हा ईशान्य दिशेचा स्वामी आहे, ज्याला ‘ईशान कोना’सुद्धा म्हटले जाते. ईशान ईश्वर किंवा देव आहे. अशाप्रकारे ही देवाची / गुरूंची दिशा आहे. म्हणून तेथे देवघर ठेवण्याचा सल्ला दिला जातो. घराच्या या भागात देवळाचे स्थान जसे आहे, ते संपूर्ण घराची ऊर्जा त्या दिशेने खेचते आणि पुढे घेऊन जाते, घराच्या मध्यभागी ठेवलेले एक मंदिर, ज्याला ब्रह्मस्थान म्हटले जाते. ते शुभकारक आहे आणि यामुळे रहिवाशांना समृद्धी आणि चांगले आरोग्य मिळू शकते.
देवघर बनवतांना ते थेट फरशीवर ठेवू नये. देवघर संगमरवरी किंवा लाकडाचे बनलेले असावे. काचेपासून बनलेली देवघरे टाळा. देवघर कोठे आहे हे यापेक्षा तेथे नियमितची पूजा-अर्चा भावपूर्ण होते ना, हेसुद्धा महत्त्वाचे असते. कुटुंबासाठी एकत्र बसून प्रार्थना करण्यास पुरेशी जागा आहे ना, याची निश्चिती करावी. देवघराच्या क्षेत्रात उर्जेचा चांगला आणि निरोगी प्रवाह असावा. ते नेहमी स्वच्छ ठेवावे. आपल्याला देवघरातून शांतता लाभणे सर्वांत महत्वाचे आहे. सध्या जागेच्या समस्येमुळे महानगरांमध्ये देवघरासाठी स्वतंत्र खोली शक्य नसते. अशा घरांसाठी भिंतीवर चढलेल्या देवघरांचा विचार करू शकता.
देवघराविषयी घ्यायची काळजी
१. देवघरात मध्यभागी गणपती, त्याच्या डाव्या हाताला स्त्री आणि उजव्या हाताला पुरुष देवता अशी मांडणी करावी.
२. देवघर सजवण्यासाठी ताजी फुले वापरावीत.
३. चांगले वातावरण निर्माण करण्यासाठी सुगंधी उदबत्त्या, धूप लावू शकतो.
४. उदबत्ती, पूजा सामग्री आणि धार्मिक पुस्तके ठेवण्यासाठी देवघराजवळ एक छोटासा खण सिद्ध करावा.
५. देवघराच्या खाली अनावश्यक वस्तू ठेवण्याचे टाळावे. या ठिकाणी केराचा डबा ठेवणे टाळावे.
६. मृत पूर्वजांची छायाचित्रे देवघरात ठेवू नयेत.
संदर्भ – www.housing.com
महाराणा प्रताप यांचा आदर्श समोर ठेवून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हावे ! – सौ. भक्ती डाफळे, हिंदु जनजागृती समिती
ज्येष्ठ मासातील महत्त्वाची व्रते !
संपादकीय : तीर्थक्षेत्रांच्या दु:स्थितीचे मूळ !
हिंदु दांपत्याला मुसलमान मुलीचे पालकत्व देण्याविषयी मदुराई उच्च न्यायालयाचा (तमिळनाडू) निवाडा !
मुलांवर साधनेचे संस्कार करणारे आणि शेवटपर्यंत देवाच्या अनुसंधानात असणारे बेळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. रामू गणपति मिसाळ (वय ६६ वर्षे) !