ध्वज आणि त्याचा स्तंभ (खांब) यांचे आध्यात्मिक महत्त्व

कोणताही ध्वज म्हटला की, तो राष्ट्र, धर्म किंवा राज्य यांचे प्रतिनिधित्व करतो. अशा ध्वजाचे आध्यात्मिक महत्त्व, ध्वजाच्या विविध रंगांचा अर्थ, ध्वजावर असलेल्या विविध चिन्हांचे महत्त्व, ध्वजस्तंभाचे आध्यात्मिक महत्त्व, तसेच सात्त्विक ध्वज आणि सात्त्विक ध्वजस्तंभ यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत. यामुळे ध्वज आणि ध्वजस्तंभ यांचे आध्यात्मिक महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल.

कु. मधुरा भोसले

१. ध्वजाचे आध्यात्मिक महत्त्व

‘प्रत्येक संस्कृती, राज्य किंवा राष्ट्र आणि विचारसरणी यांचे प्रतीक ध्वज करत असतो. धर्माचे प्रतीक असणारा धर्मध्वज सर्व विख्यात आहे. हिंदु धर्माचा ध्वज भगवा आहे. श्रीकृष्णाच्या रथावर गरुडध्वज होता. महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या रथावर कपिध्वज होता. कार्तिकेयाच्या रथावर कोंबड्याचे चित्र असलेला ध्वज असतो. कामदेवाच्या रथावर मकरध्वज असतो. ध्वजाचा रंग आणि त्यावर असलेले चिन्ह यांतून विशिष्ट प्रकारची शक्ती वातावरणात प्रक्षेपित होते. त्याचप्रमाणे ध्वजावरील चिन्हातून विशिष्ट विचारसरणीही व्यक्त होत असते, उदा. ‘ॐ’ चिन्ह असलेल्या भगव्या ध्वजातून हिंदु धर्माची शक्ती आणि निर्गुण तत्त्वाची उपासना दिसून येते. त्याचप्रमाणे पिवळसर रंगाच्या ध्वजावर यज्ञवेदीचे चित्र असल्यास यज्ञातून चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे आणि यज्ञसंस्कृतीचे महत्त्व मनावर बिंबते.

१ अ. ध्वजाच्या विविध रंगांचा अर्थ

१ आ. ध्वजावर असलेल्या चिन्हाचे महत्त्व

२. ध्वजाच्या स्तंभाचे आध्यात्मिक महत्त्व

ज्याप्रमाणे व्यक्तीला ताठ उभे रहाण्यासाठी पाठीचा कणा महत्त्वाचा असतो, तसे ध्वजाला हवेत फडकण्यासाठी ध्वजस्तंभ महत्त्वाचा असतो.

२ अ. बुडाशी जाड आणि टोकाकडे निमुळता आकार असणार्‍या ध्वजस्तंभाचे (खांबाचे) आध्यात्मिक महत्त्व (सात्त्विक ध्वजस्तंभ क्रमांक १) : ध्वजाचा स्तंभ बुडाशी जाड आणि वरच्या दिशेने निमुळता झालेला असेल, तर ध्वजाच्या स्तंभामध्ये ईश्वराकडून उर्ध्व, म्हणजे आकाशाच्या दिशेने येणार्‍या लहरी ग्रहण होऊन त्या तेजतत्त्वाच्या स्तरावर ध्वजामध्ये संक्रमित होतात आणि त्या ध्वजातून संपूर्ण वायुमंडलात प्रक्षेपित होतात. त्याचप्रमाणे उर्वरित लहरी स्तंभाच्या बुडाशी जाऊन भूमीमध्ये पसरतात. त्यामुळे अशा ध्वजस्तंभाला लावलेल्या ध्वजामुळे सूक्ष्म स्तरावरील कार्य लवकर पूर्ण होते. त्यामुळे एकसारख्या जाडीच्या ध्वजस्तंभापेक्षा बुडाशी जाड आणि वरच्या दिशेने निमुळता असलेला ध्वजस्तंभ आध्यात्मिकदृष्ट्या अधिक चांगला आहे अन् तो धर्मसंस्थापना होईपर्यंत असणे आवश्यक आहे.

२ आ. एकसारख्या जाडीच्या ध्वजस्तंभाचे (खांबाचे) आध्यात्मिक महत्त्व (सात्त्विक ध्वजस्तंभ क्रमांक २) : ध्वजस्तंभ एकाच जाडीचा असेल, तर त्याला ईश्वराकडून येणार्‍या निर्गुण लहरी अधिक प्रमाणात ग्रहण करता येत नाहीत. त्यामुळे धर्मसंस्थापना होईपर्यंत एकसारख्या जाडीचा ध्वजस्तंभ महत्त्वाचा नाही. धर्मसंस्थापना झाल्यानंतर भूमी सात्त्विक झाल्यामुळे तिच्यातील सात्त्विकता ध्वजस्तंभातून ऊर्ध्व दिशेने प्रवाहित होऊन ती ध्वजस्तंभातून ‘वायू’ आणि ध्वजाच्या माध्यमातून ‘तेज’ या तत्त्वांच्या स्तरांवर प्रक्षेपित होते. त्यामुळे धर्मसंस्थापना झाल्यानंतर एकसारख्या जाडीचा ध्वजस्तंभ अधिक उपयुक्त आहे.

३. सात्त्विक ध्वज आणि सात्त्विक ध्वजस्तंभ यांची गुणवैशिष्ट्ये

४. सात्त्विक ध्वजस्तंभ क्रमांक १ आणि क्रमांक २ यांतील भेद

कृतज्ञता

हे ईश्वरा, तुझ्या कृपेमुळे आम्हाला ध्वज आणि ध्वजस्तंभ यांचे आध्यात्मिक महत्त्व समजले, यासाठी तुझ्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन संस्था, रामनाथी, गोवा. (७.५.२०२१)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.