मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतरही कांद्याच्या खरेदीवरून विरोधकांचा सभागृहात गोंधळ !

मुख्यमंत्री उत्तर देत असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना ‘शेतकर्‍यांच्या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे कि राजकारण करायचे आहे ?’, असा प्रश्न उपस्थित केल्यावर विरोधक जागेवर बसले.

दुसर्‍या दिवशीचे विधीमंडळाचे कामकाज विलंबाने मिळत असल्‍याची विरोधी पक्षनेत्‍यांची तक्रार !

अधिवेशनाच्‍या दुसर्‍या दिवसाचे कामकाज रात्री १२ वाजता मिळते. एवढ्या विलंबाने विषय कळल्‍यानंतर त्‍याची माहिती घेण्‍यासाठी एवढ्या रात्री कुणाला उठवायचे ? कामकाज रात्री १० वाजेपर्यंत मिळाल्‍यास त्‍यावरील उत्तरे घेता येतील, अशा शब्‍दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहितीच्‍या सूत्राखाली…

जिल्ह्यांची नाव पालटण्याची प्रक्रिया चालू – उपमुख्यमंत्री

आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते. महसूल आणि वन विभाग, तसेच नगर विकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचेही नाव पालटेल.

राष्‍ट्रपती राजवट कुणाच्‍या सांगण्‍यावरून लागली ? हेही शरद पवार यांनी स्‍पष्‍ट करावे ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्‍या मुलाखतीमध्‍ये ‘अजित पवार यांच्‍या समवेत घेण्‍यात आलेल्‍या शपथविधीविषयी शरद पवार यांना माहिती होती’, असा गौप्‍यस्‍फोट केला होता.

संभाजीनगर घरकुल घोटाळ्याची ‘ईडी’कडून चौकशी !

महापालिका अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या अडचणीत वाढ ! ठेकेदाराच्या मर्जीनुसार प्रकल्प आखणी !

‘पंचमहाभूत बोध’ प्रयोगात मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांनी घेतली पंचतत्त्वांच्या संरक्षणाची शपथ !

प.पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून निर्माते दिग्दर्शक विजू माने यांनी सिद्ध केलेल्या या प्रयोगाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. केवळ २० मिनिटांत ५० कलाकारांच्या सहभागातून हा प्रयोग सादर करण्यात आला आहे.

‘पंचमहाभूत लोकोत्सवाच्या’ माध्यमातून सर्वांनी पर्यावरणजागृतीसाठी कृतीशील व्हावे ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंचमहाभूत लोकोत्सव प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक, महिला, शेतकरी, शास्त्रज्ञ यांनी पाहिला पाहिजे आणि त्यातून कृतीशील व्हायला पाहिजे !

‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.’चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांना ‘उद्यम कौस्तुभ’ पुरस्कार प्रदान !

‘ब्राह्मण बिजनेस नेटवर्क ग्लोबल संस्थे’च्या मुंबई विभागाच्या वतीने ब्राह्मण उद्योजकांसाठी दोन दिवसांच्या परिषदेचे येथे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने संस्थेच्या वतीने प्रतिवर्षी उद्योग जगतात उल्लेखनीय कार्य करणार्‍या ब्राह्मण उद्योजकांचा सन्मान करण्यात येतो.

‘शिवसेना’ नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला !

केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय !
‘धनुष्यबाण’ हे चिन्हही शिंदे गटाला मिळाले !

पहाटेच्‍या शपथविधीच्‍या आधी शरद पवारांशी चर्चा झाली होती ! – उपमुख्‍यमंत्र्यांचा गौप्‍यस्‍फोट

पहाटेच्‍या शपथविधीच्‍या आधी शरद पवारांशी चर्चा झाली होती. अजितदादा प्रामाणिकपणे आले, नंतर आम्‍हाला तोंडघशी पाडले. सर्व काही वरिष्‍ठ स्‍तरावर ठरले होते. हा दुसरा छोटा विश्‍वासघात होता, असे प्रतिपादन उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.