धार्मिक भावना दुखवायचा अधिकार कुणी दिला ?

‘आजकाल सनातन धर्माची खिल्ली उडवण्याचा ट्रेंड (प्रथा) चालू झाला आहे. कलाकार आणि दिग्दर्शक यांनी चित्रपटनिर्मितीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली परंपरेची खिल्ली उडवू नये’, अशी चेतावणीही ‘रामायण’ मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारे अरुण गोविल यांनी दिली.

ओम राऊत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी  !

आदिपुरुष चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. या चित्रपटाचा फक्त ‘टीझर’ आलेला आहे; मात्र टीझर पाहून अनेक लोकांनी आक्षेप व्यक्त केला आहे. हे टीझर पाहून आमच्याही मनात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

(अज्ञानी) पुरुष !

‘आताच्या पिढीची आवड वेगळी आहे’, असे गृहित धरून तिच्यासमोर वेगळ्या अंगाने रामायण मांडण्याचा प्रयत्न जर कुणी करत असेल, तर ‘तो अज्ञानीच आहे’, असे म्हणावे लागेल. अशा अज्ञानींना योग्य ज्ञान करवून देण्यासाठी धर्माभिमानी हिंदूंनी घेतलेला पुढाकार योग्य म्हणावा लागेल ! आधुनिकतेच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांचे अयोग्य चित्रण अस्वीकारार्ह !

‘आदिपुरुष’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत यांना कायदेशीर नोटीस

या चित्रपटातील हनुमानाची भूमिका करणार्‍यालाही मुसलमानांप्रमाणे मिशी न दाखवता दाढी दाखवली आहे. रावणालाही त्याचप्रमाणे दाढी दाखवून त्याच्या डोळ्यांत मुसलमानाप्रमाणे सुरमा घातला आहे.

‘आदिपुरुष’ चित्रपटाला प्रदर्शित होऊ देणार नाही ! – विहिंपची चेतावणी

संभल (उत्तरप्रदेश) येथील विहिंपचे विभाग प्रचार प्रमुख अजय शर्मा यांनी म्हटले की, चित्रपटांमध्ये हिंदूंच्या आदर्शांना चुकीच्या पद्धतीने दाखवणे ही धर्माची थट्टा आहे.

आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटातील रावणाला मोगल आक्रमकांप्रमाणे दाखवले ! – सामाजिक माध्यमांतून टीका

रावणाची वेशभूषा जर मुसलमानाप्रमाणे केली गेली असेल, तर केंद्रीय परिनिरीक्षण मंडळाने (‘सेन्सॉर बोर्डा’ने) हिंदूंच्या भावना लक्षात येऊन त्यात पालट करण्यास चित्रपट निर्मात्यांना सांगणे अपेक्षित आहे !

सामाजिक भान विसरलेली हिंदी चित्रपटसृष्टी !

हिंदी चित्रपटसृष्टीला शिखरावर पोचवण्यात महत्त्वाचे योगदान देणार्‍यांचीही आता दुसरी किंवा तिसरी पिढी सध्या चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. ‘वाडवडिलांनी दिलेला वारसा टिकवता आला नाही, तरी त्यांचे नाव धुळीला मिळवण्याचे काम केले नाही म्हणजे झाले’, असे म्हणण्याची वेळ सध्या आली आहे !

‘थँक गॉड’ चित्रपटाच्या विरोधात जौनपूर (उत्तरप्रदेश) येथे पोलिसात गुन्हा नोंद !

चित्रपटातून हिंदूंची देवता चित्रगुप्त यांचे विडंबन केल्याचे प्रकरण

देशवासियांमध्ये जागृती !

‘आपण काहीही दाखवले, तरी भारतीय जनता आपल्याला डोक्यावर घेतेच’, हा समज आता बॉलिवूडने दूर केला पाहिजे. भारतियांमध्ये राष्ट्र आणि धर्म प्रेम आता जागृत होत आहे. हा भारत आणि हिंदु धर्म यांसाठी नक्कीच आशेचा किरण आहे !

हिंदु धर्मविरोधकांना चाप !

. . . याचा अर्थ हिंदु समाजमन आता जागे होत असून जागृत हिंदू त्यांच्या श्रद्धास्थानांप्रती सजग झाले आहेत. कोणतेही मोठे नेतृत्व नसतांना सामाजिक माध्यमांचा आधार घेऊन, तसेच छोट्या छोट्या कृतींमधून हिंदू धर्मविरोधकांना धडा शिकवण्यासाठी सज्ज झाले आहेत !