
नवी देहली – रामायणावर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटांमध्ये रावण, हनुमान आदी व्यक्तीपुरुषांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याने त्याचा आता सर्वच स्तरांतून विरोध केला जात आहे. आता या चित्रपटाचा विश्व हिंदु परिषदेनेही विरोध केला आहे. ‘हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये चालू देणार नाही’, अशी चेतावणी दिली आहे. जानेवारी २०२३ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
#Adipurush teaser | The Vishva Hindu Parishad raised objections to the portrayal of Lord Ram, Lakshman and Ravana in the teaser of Adipurush, claiming that it “ridiculed Hindu society”.https://t.co/qXRlv2bzPR
— The Hindu (@the_hindu) October 5, 2022
संभल (उत्तरप्रदेश) येथील विहिंपचे विभाग प्रचार प्रमुख अजय शर्मा यांनी म्हटले की, चित्रपटांमध्ये हिंदूंच्या आदर्शांना चुकीच्या पद्धतीने दाखवणे ही धर्माची थट्टा आहे. सेन्सॉर बोर्ड दायित्वशून्य काम करत आहे. बोर्ड त्याच्या कर्तव्यांचे पालन करत नाही. त्यामुळे सरकारने त्याला विसर्जित केले पाहिजे.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा