आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने रशियाच्या ऑलिंपिक समितीची मान्यता केली रहित !

रशियाने आयओसीच्या नियमांचे उल्लंघन करत ‘डोनेट्स्क पीपल्स रिपब्लिक’, ‘खेरसॉन’, ‘लुहान्स्क पीपल्स रिपब्लिक’ आणि ‘जापोरिजीया’ या क्षेत्रांना प्रांतीय ऑलिंपिक संघटनेची मान्यता दिली. हे आयओसीच्या नियमांच्या विरोधात आहे.

बाटला हाऊस चकमकीच्या प्रकरणातील आतंकवाद्याची फाशीची शिक्षा जन्मठेपेत परावर्तित !

‘जिहादी आतंकवाद्यांना फाशीचीच शिक्षा होणे आवश्यक आहे’, असेच प्रत्येक राष्ट्राभिमान्याला वाटेल, यात शंका नाही !

भारत-चीन सैनिकी स्तरावरील चर्चेत सीमेवर शांतता राखण्यावर एकमत

चीनने सीमेवर शांतता राखण्याविषयी सहमती दर्शवली असली, तरी त्याच्यावर विश्‍वास ठेवता येणार नसल्याने भारताला नेहमीच सतर्क रहावे लागणार आहे !

Life Skills Course : देशभरातील महाविद्यालयांत चालू होणार ‘जीवन कौशल्य अभ्यासक्रम’ !

केंद्रशासनाने युवा पिढीची स्थिती पाहून अशा प्रकारचा अभ्यासक्रम आणला, हे स्तुत्य पाऊल आहे. यासह युवा पिढीला साधना शिकवून तिच्याकडून ती करून घेतली, तर तिच्या जीवनातील अनेक समस्या ती स्वत: सोडवण्यास सक्षम बनेल !

खलिस्तानी आतंकवादी अर्श डल्ला याच्या २ साथीदारांना देहलीत अटक

देहली पोलिसांनी खलिस्तानी आतंकवादी अर्श डल्लाच्या  जवळच्या २ साथीदारांना येथे अटक केली. हे दोघे आरोपी पंजाबमध्ये मोठा घातपात घडवण्याच्या सिद्धतेत होते. पोलिसांनी त्यांच्याकडून शस्त्रे आणि हातबाँब जप्त केले आहेत.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून ६ राज्यांत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ठिकाणांवर धाडी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ११ ऑक्टोबर या दिवशी उत्तरप्रदेश, देहली, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या ६ राज्यांमध्ये पी.एफ्.आय. (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) च्या १२ ठिकाणी धाडी घातल्या.

‘विवो’च्या व्यवस्थापकीय संचालकासह ४ जणांना अटक

घोटाळेबाज चिनी आस्थापनांवर भारतात बंदी घालून त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे !

पुढील २०-२५ वर्षांत भारताचे ‘स्पेस स्टेशन’ (अंतराळातील स्थानक) ! – ‘इस्रो’चे प्रमुख एस्. सोमनाथ

भारत पुढील २०-२५ वर्षांत अंतराळात स्वत:चे ‘स्पेस स्टेशन’ स्थापेल. गगनयान मोहिमेनंतर ‘स्पेस स्टेशन’ (अंतराळातील स्थानक) बनवण्याचे काम हाती घेण्यात येईल.

देहलीतील ‘एम्स’ रुग्णालयात चालू होणार ‘आध्यात्मिक औषधोपचार’ विभाग !

मनुष्य जीवनातील ८० टक्के समस्या आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात. त्यामुळे त्यांची उत्तरे अर्थातच अध्यात्मशास्त्रच देऊ शकते. अध्यात्माविषयी काडीचेही ज्ञान नसणारे काही डॉक्टर यास विरोध करतात, यात काय आश्‍चर्य ?

विनाकारण व्यक्तीला ३० मिनिटे कोठडीत डांबणार्‍या पोलिसांना ५० सहस्र रुपयांचा दंड !

देहली उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! न्यायालयाने अशाच प्रकारच्या आणि याहून अधिक कठोर शिक्षा उद्दाम पोलिसांना केल्यास त्यांच्या थोडातरी पालट होईल, अशी अपेक्षा !