आर्थिक गैरव्यवहार केल्याने कारवाई
नवी देहली – भ्रमणभाष (स्मार्टफोन) बनवणारे चिनी आस्थापन ‘विवो’चे व्यवस्थापकीय संचालक हरिओम राय यांच्यासह ४ जणांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक चिनी नागरिक आणि एक सनदी लेखापाल (सीए) यांचा समावेश आहे. भारतात कर भरावा लागू नये, यासाठी ‘विवो’कडून चीनमध्ये ६२ सहस्र ४७६ कोटी रुपये अनधिकृतरित्या हस्तांतरित केले गेल्याचे ईडीने म्हटले आहे.
सौजन्य सीनबईसी टीव्ही 18
वर्ष २०१८ ते २०२१ या कालावधीत भारत सोडून मायदेशी गेलेले ३ चिनी नागरिक आणि चीनमध्येच रहाणार्या एकाने भारतामध्ये २३ वेगवेगळी आस्थापने स्थापन केली. या आस्थापनांनी ‘विवो’च्या खात्यामध्ये मोठी रक्कम भरली. त्यानंतर विक्रीमधून आलेल्या १ लाख २५ हजार १८५ कोटी रुपयांपैकी ६२ सहस्र ४७६ कोटी रुपयांची रक्कम प्रामुख्याने चीनमध्ये हस्तांतरित करण्यात आली. आस्थापनाला मोठी हानी झाल्याचे दाखवून करांमधून सवलत घेण्यासाठी हा खटाटोप करण्यात आल्याचे ईडीने स्पष्ट केले.
संपादकीय भूमिकाघोटाळेबाज चिनी आस्थापनांवर भारतात बंदी घालून त्यांची सर्व संपत्ती जप्त केली पाहिजे ! |